RR vs PBKS Match Updates PBKS, Twiter
Sports

RR vs PBKS Match : पंजाब किंग्जकडून धावांचा 'शिखर', राजस्थानसमोर ठेवलं तगडं आव्हान

IPL 2023 : पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १९७ धावांचं आव्हान उभं केलं आहे.

Satish Daud

IPL 2023 RR vs PBKS Match : कर्णधार शिखर धवनची ५६ चेंडूत नाबाद ८६ धावांची खेळी आणि त्याला प्रभसिमरनकडून लाभलेल्या सुरेख साथीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १९७ धावांचं आव्हान उभं केलं आहे. शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी पावरप्लेमध्ये पंजाबला दणक्यात सुरूवात करुन दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेट्साठी ९० धावांची भागिदारी केली. (Latest sports updates)

प्रभसिमरनने राजस्थानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ६० धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ७ चौकार लगावले. पावरप्लेमध्ये त्याने राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (IPL 2023

एकीकडे प्रभसिमरन मोठे फटके मारत असताना, दुसरीकडे  शिखर धवन (Shikhar Dhawan) एकाबाजूने उभा होता. शिखर धवन याने सुरुवातीला एकेरी आणि दुहेरी धावसंख्यावर भर दिला. शिखर धवन याने सुरुवातीला तीस चेंडूत फक्त तीस धावांची खेळी केली.

पण, प्रभसिमरन ६० धावा काढून बाद झाल्यानंतर शिखर धवनने राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.धवनने कर्णधारपदाला साजेशी ५६ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान धवन याने ९ चौकार आणि तीन षटकार लगावले. (Sport News)

विराट कोहली आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर आयपीएलमध्ये अर्धशतकचे अर्धशतक पूर्ण करणारा शिखर धवन तिसरा खेळाडू ठरला आहे. राजस्थानकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी १९८ धावांची गरज आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT