IPL 2023 Csk Vs MI Saamtv
Sports

IPL 2023 MI Vs CSK: रोहितची रणनिती भेदणार धोनीचे 'हे' ३ खास खबरी; मुंबईकर खेळाडूचं ठरणार MI साठी डोकेदुखी?

IPL 2023: चेन्नईकडून खेळणारे तीन खेळाडू मुंबईसाठी मोठा अडथळा ठरु शकतात.

Gangappa Pujari

Mumbai Indians Vs Chennai Supar Kings: आयपीएलमधील दोन दिग्गज संघ म्हणजेच चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच यंदाच्या मोसमात आमने सामने येणार आहेत. आजच्या दिवसातील दुसरा सामना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपरकिंग्समध्ये रंगणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.हा सामना जिंकून मुंबई आपला पहिला विजय साकार करेल, मात्र चेन्नईकडून खेळणारे तीन खेळाडूच त्यांच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकतात.

अनुभवी अजिंक्य रहाणे ऑलराउंडर शिवम दुबे, आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे या तिघांना वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत खडानखडा माहिती आहे. त्यामुळे या तिघांपैकी कुणा एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळो न मिळो, पण इथे मुंबईला धोका निश्चित आहे.

अजिंक्य रहाणे..

भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यंदा चेन्नईच्या ताफ्यात आहे. चेन्नईने अजिंक्यला ऑक्शनमध्ये 50 लाख या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. रहाणेने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचंही प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे मुंबईची रणनिती समजायला रहाणे महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. रहाणेने 2009 पासून ते 2022 पर्यंत एकूण 158 सामन्यांमध्ये 4 हजार 74 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे.

शिवम दुबे...

चेन्नईने शिवम दुबेसाठी 4 कोटी रुपये मोजले. शिवमला मुंबईत खेळण्याचा अनुभव आहे. ज्याचा फायदा चेन्नईसंघासाठी होऊ शकतो. शिवम देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. या मोसमातील 2 सामन्यात शिवमने 46 धावा केल्या आहेत. शिवमने 15 व्या मोसमातील 11 सामन्यात 289 धावा केल्या आहेत.

तुषार देशपांडे

तुषार देशपांडे हा अनकॅप्ड प्लेअर आहे. तुषारला चेन्नईने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आपल्या गोटात घेतलं. तुषारने चेन्नईकडून या मोसमातील दोन्ही सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यालाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियमबद्दल खडानखडा माहिती आहे. त्यामुळे हे तीनही खेळाडू चेन्नईसाठी कसे उपयुक्त ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT