MI vs SRH
MI vs SRH IPL twitter
क्रीडा | IPL

IPL 2023, MI vs SRH: मुंबईला प्ले ऑफसाठी 'ग्रीन' सिग्नल? हैदराबादवर दणदणीत विजय

साम टिव्ही ब्युरो

IPL 2023, MI vs SRH: मुंबई इंडियन्सने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सनसायझर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. पहिली फलंदाजी करताना हैदराबादने मुंबईसमोर 201 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हैदराबादचे हे आव्हान अवघ्या 18 षटकातं पूर्ण केले.

कॅमरॉन ग्रीनने मुबंईसाठीच्या 'करो या मरो' सामन्यात धडाकेबाज शतक साजरं केलं. कर्णधार रोहित शर्माची बॅटही महत्त्वाच्या सामन्यात तळपली. शेवटी सूर्यकुमार यादवनेही तुफान फटकेबाजी केली.  (Latest Marathi News)

हैदराबादने दिलेले 201 धावांचं लक्ष्य मुंबईने 2 गडी गमावत पूर्ण केलं. मुंबईसाठी कॅमरॉन ग्रीनने नाबाद शतक झळकावले. ग्रीन अवघ्या 47 चेंडूत 212 च्या स्ट्राईक रेटने 100 धावा कुटल्या. यात त्यांना 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. कर्णधार रोहितनेही 37 चेंडूत 56 धावा केल्या. सूयकुमार यादवनेही 16 चेडूंत 25 धावा केल्या.

हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक 83 धावा केल्या. तर विव्रत शर्मानेही 69 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून आकाश मधवालने 4 आणि ख्रिस जॉर्डनने 1 विकेट घेतली. (Cricket News Update)

...तर मुंबईचं प्ले ऑफमधलं स्थान निश्चित

आजच्या विजयासह मुंबई संघ 16 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. तर राजस्थानचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. गुजरात, चेन्नई आणि लखनौच्या संघांनी आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

आता चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि आरसीबी यांच्यात लढत आहे. बंगळुरूमध्ये आरसीबी आणि गुजरातच्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे हा सामना वाहून गेला तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये नक्की पोहोचेल. त्याचवेळी आरसीबी जिंकल्यास मुंबई प्लेऑफमधून बाहेर पडेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कन्हैय्या कुमार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, उत्तर दिल्ली लोकसभा मतदारसंघातून रिंगणात

Special Report : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला, Shriniwas Pawar यांचं अजितदादांना आव्हान

IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Special Report : Fake Currency | यूट्यूबवर प्रशिक्षण घेऊन घरातच बनावट नोटा छापणाऱ्यांना अटक

SCROLL FOR NEXT