Rinku Singh Hits 5 Sixes  ICC Twitter
क्रीडा

IPL 2023: रिंकू सिंगच्या सलग 5 षटकारांनंतर सोशल मीडियावर 'मीम्स'चा पाऊस

KKR vs GT Most Miraculous win in IPL History : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग याने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Chandrakant Jagtap

Rinku Singh Hits 5 Sixes : गुजरात टायटन्सविरोधात कोलकाताने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात चमत्कारिक विजय मिळवला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) फलंदाज रिंकू सिंग याने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (GT Vs KKR) यांच्यातील रोमांचक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत रिंकू सिंगला स्ट्राईक दिली. यानंतर जे घडले ते कुणालाही अपेक्षित नव्हते. रिंकु सिंगने शेवटच्या पाच चेंडूवर 5 षटकार ठोकून केकेआरला विजय मिळवून दिला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2023 चा 13वा सामना जिंकण्यासाठी कोलकाताला शेवटच्या षटकात 29 धावांची गरज होती आणि रिंकूने यश दयालच्या षटकात सलग पाच षटकार मारून कोलकाताला तीन विकेट्सने अविश्वसनीय विजय मिळवून दिला. रिंकू सिंगला त्याच्या मॅचविनिंग इनिंगसाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने कोलकात्यासमोर विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयपीएलमध्ये इतिहास रचत गुजरात टायटन्सने पहिल्यांदाच २०० धावांचा टप्पा ओलांडला. मात्र त्यांच्या आनंद जास्त काळ टिकला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती आणि रिंकू सिंग आणि उमेश यादव क्रीजवर उपस्थित होते. उमेश यादवने सिंगल धाव घेतली आणि रिंकूला स्ट्राइक दिली. यानंतर रिंकूने कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने यश दयालविरुद्ध सलग पाच षटकार मारून कोलकाताला 3 विकेट्सने अविश्वसनीय विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

रिंकू सिंगने झंझावाती खेळी करताना केवळ 21 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याने एक चौकार आणि पाच षटकार मारत 48 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. रिंकूने 228 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना 5 षटकार मारणारा तो आता T20 क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election:निकालानंतर सत्ता समीकरण बदलणार? नवाब मलिकांपाठोपाठ वळसे पाटलांचे संकेत

Horoscope Today : स्वतःचे अस्तित्व वेगळेपणाने जाणवेल, दिवसभरात भाग्यकारक घटना घडतील; तुमची रास कोणती?

Horoscope Today: 'या' राशींच्या व्यक्तींना होणार धनलाभ, वाचा आजचं राशीभविष्य

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

SCROLL FOR NEXT