IPL 2023, LSG vs DC Live Updates  Saam TV
क्रीडा

LSG vs DC IPL Match : मार्क वुडच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीचे फलंदाज ढेर; लखनौचा ५० धावांनी विजय

LSG vs DC IPL Match : काइल मेयर्सच्या ३८ चेंडूत ७३ धावा आणि मार्क वुडने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर लखनौ सुपर सुपरजायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल ५० धावांनी पराभव केला.

Satish Daud

IPL 2023, LSG vs DC Live Updates : काइल मेयर्सच्या ३८ चेंडूत ७३ धावा आणि मार्क वुडने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केएल राहुलच्या लखनौ सुपर सुपरजायंट्सने डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा तब्बल ५० धावांनी पराभव केला. या विजयासह लखनौ संघाने आयपीएल २०२३ मध्ये गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. (Latest sports updates)

लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर १९३ धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांची दमछाक झाली. वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या वेगवान माऱ्यासमोर दिल्लीचे फलंदाज जास्त काळ तण धरू शकले नाही. परिणामी दिल्लीचा डाव १४३ धावांवर आटोपला.

मार्क वुडने भेदक मारा करत दिल्लीच्या ५ फलंदाजांना (Cricket News) माघारी पाठवलं. त्याला रवी बिश्नोई २ गडी आणि चेतन साकारिया २ गडी यांनी चांगली साथ दिली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर ५६ धावा, राईले रूसो ३० धावा, अक्षर पटेल १६ आणि पृथ्वी शॉ १२ धावा वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतलेल्या डेव्हिड वॉर्नरने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावरप्लेमध्ये त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी काही काळ सार्थ ठरवला. डावखुरा गोलंदाज चेतन साकारिया याने केएल राहुलला झटपट माघारी पाठवलं.

राहुल १२ चेंडूत केवळ ८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दीपक हुड्डाने सलामीवीर काइल मेयर्सला चांगलीच साथ दिली. दोघांनी मिळून दिल्लीच्या गोलंदाजांचा हवा काढून टाकली. दोघांमध्ये मोठी भागीदारी होत असताना, कुलदीप यादवने दीपक हुड्डाला बाद केलं. हुड्डा १८ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या स्टॉईनिसला खलील अहमदने झटपट माघारी पाठवलं. एकीकडे लखनौचे फलंदाज झटपट माघारी परतत असताना दुसरीकडे काइल मेयर्सने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. मेयर्स ३८ चेंडूत ७३ धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ७ टोलेजंग षटकार लगावले. त्यानंतर कृणाल पांड्या, निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी झटपट धावा करत लखनौला १९३ धावा अशा सुस्थितीत नेलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

SCROLL FOR NEXT