Jonty Rhodes Viral Video Saam TV
Sports

Jonty Rhodes Viral Video: भावा जिंकलस! जॉन्टी रोड्सवर मैदानातील छोट्याशा कृतीमुळे कौतुकाचा वर्षाव

Jonty Rhodes Viral Video: मैदानावरील कव्हर आणण्यासाठी ग्राउंड स्टाफला जॉन्टी रोड्सने मदत केली.

साम टिव्ही ब्युरो

Jonty Rhodes Viral Video:  चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील कालचा सामना पावसामुळे रद्द झाला. सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र या निराशेच्या वातावरणात एक चांगलं दृष्य मैदानात उपस्थित असलेल्या अनेकांनी पाहिलं.

पाऊस सुरु झाल्यानंतर ग्राऊंड स्टाफने तातडीने मैदानावर कव्हर टाकण्यास सुरुवात केली. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स देखील ग्राऊंड स्टाफला मदत करताना दिसला. मैदानावरील कव्हर आणण्यासाठी ग्राउंड स्टाफला जॉन्टी रोड्सने मदत केली. (IPL 2023)

जॉन्टी रोड्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत. जॉन्टी रोड्स कव्हर ओढत असताना तेथील ग्राऊंड स्टाफने त्याला तसं न करण्याची विनंतही केली.

त्यानंतर जॉन्टी मागे हटला. मात्र काही वेळातच पुन्हा एकदा जॉन्टी कव्हर ओढू लागला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जॉन्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Latest sports updates)

कोण आहेत जॉन्टी रोड्स?

जगातील सर्वोत्तम फिल्डर म्हणून जॉन्टी रोड्सची ओळख होती. फिल्डिंग करताना जॉन रोड्स इतका चपळ होता फलंदाज एकदी धाव चोरताना अनेकदा विचार करत असे. जॉन्टी रोड्सने दक्षिण आफ्रिकेसाठी 52 कसोटी आणि 245 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2532 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5935 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये रोड्सने 2 शतके आणि 33 अर्धशतके झळकवली आहेत.

सामन्यात काय झालं?

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने 19.2 षटकात 7 विकेट गमावत 125 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

SCROLL FOR NEXT