IPL 2023 CSK Schedule twitter
Sports

IPL 2023 CSK Schedule: चेन्नईमध्ये ४ वर्षांनंतर घुमणार धोनी... धोनी... आवाज! येथे पाहा सीएसकेचं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2023 CSK Schedule: पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

Chandrakant Jagtap

IPL 2023 CSK Schedule: आयपीएलचा आगामी हंगाम चार वर्षांनंतर पुन्हा एकदा होम आणि अवे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संघ सात सामने घरच्या मैदानावर आणि सात सामने बाहेरच्या मैदानावर खेळतील. आयपीएलच्या ५२ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग टप्प्यातील सामने १२ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. स्पर्धेची सुरुवाता ३१ मार्चपासून होणार आहे. पहिला सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर IST संध्याकाळी ७:३० वाजता गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

आयपीएल २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही ४ वर्षांनंतर सीएसके फ्रँचायझीच्या चेन्नईच्या होम ग्राउंड खेळण्यासाठी उतरणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये यंदाच्या आयपीएलबद्दल अतिशय उत्सुकता आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही येथे पाहू शकता. (Sports News)

IPL 2023 मध्ये CSK चे संपूर्ण वेळापत्रक

१) ३१ मार्च : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (अहमदाबाद)

२) ३ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (चेन्नई)

३) ८ एप्रिल : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (मुंबई)

४) १२ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (चेन्नई)

५) १७ एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (बेंगळुरू)

६) २१ एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (चेन्नई)

७) २३ एप्रिल : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (कोलकाता)

८) २७ एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (जयपूर)

९) ३० एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज (चेन्नई)

१०) ०४ मे : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (लखनऊ)

११) ०६ मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (चेन्नई)

१२) १० मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई)

१३) १४ मे : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (चेन्नई)

१४) २० मे : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (दिल्ली)

चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ:

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, कायले जेमिंसन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतिशा पाथिराना, सिमरजित सिंग, दीपक चहर, प्रशांत सोळंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

Sachin Pilgaonkar: 'मी उर्दूसोबत झोपतो, रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच...; सचिन पिळगांवकरांचे पुन्हा एक वकव्य चर्चेत

Retirement Planning: EPF, NPS की PPF; कोणत्या योजनेत मिळणार सर्वाधिक परतावा? कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT