IPL 2022: नवे वर्ष, नवा हंगाम, नवे कर्णधार? कोण असतील 10 धुरंधर  Twitter/ @IPL
Sports

IPL 2022: नवे वर्ष, नवा हंगाम, नवे कर्णधार? कोण असतील 10 धुरंधर

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) शेवटच्या वेळी चार वेळा आयपीएल विजेत्या CSK चे नेतृत्व करू शकतो.

वृत्तसंस्था

आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मेगा लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. BCCI ने फ्रँचायझींना कळवले आहे की मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात 10 संघ खेळताना दिसणार आहेत. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचाही समावेश करण्यात आला आहे. जुन्या 8 संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली आहे. पुढील सत्रात कोणता खेळाडू कोणत्या संघाचा कर्णधार होऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्स

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) शेवटच्या वेळी चार वेळा आयपीएल विजेत्या CSK चे नेतृत्व करू शकतो. नोव्हेंबरमध्ये रिटेन्शन दरम्यान फ्रँचायझीने कायम ठेवलेला धोनी हा दुसरा खेळाडू होता. अष्टपैलू रवींद्र जडेजा हा 16 कोटी रुपयांसाठी CSK ची पहिली पसंती होता, तर धोनीने पगारात कपात केली आणि त्याला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले. धोनीच्या निवृत्तीनंतर या सर्व गोष्टींची जबाबदारी जडेजाकडे असेल हेही या हालचालीवरून दिसून येते. IPL 15 मध्ये जडेजा धोनीसोबत संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्स (MI)

पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. अलीकडेच वनडे संघाची कमानही रोहितकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने 16 कोटी रुपयांना रिटेन केले.

दिल्ली कॅपिटल्स (DC)

आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर पंतने संघाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, अय्यर परतल्यानंतरही पंत संघाचा कर्णधार राहिला. दिल्ली कॅपिटल्सने अय्यरला राइट ऑफ केलेले नाही. अशा स्थितीत ऋषभ पंत पुढील हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

राजस्थान रॉयल्स (RR)

यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत तो पुन्हा एकदा आगामी IPL 15 मध्ये संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (SRH)

सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला 14 कोटी, अब्दुल समदला 4 कोटी आणि उमरान मलिकला 4 कोटींमध्ये कायम ठेवले. त्यात डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, जेसन रॉय, रशीद खान आणि भुवनेश्वर कुमार यांसारखी मोठी नावे कायम ठेवली नाहीत. अशा स्थितीत केन पुढील हंगामात संघाची धुरा सांभाळताना दिसू शकतो.

पंजाब किंग्स (PBKS)

संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पुष्टी केली आहे की फ्रँचायझी मयंक अग्रवालकडे नेतृत्व देऊ शकते. 12 कोटी रुपयांची मयंकला संघाने रिटेन केला आहे. याशिवाय पंजाबने अर्शदीप सिंगला 4 कोटी रुपयांना रिटेन केले होते. पंजाबने केएल राहुल, रवी बिश्नोई आणि निकोलस पूरन या खेळाडूंना संघातून वगळले आहे. अर्शदीप सिंग हा अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (KKR)

दोन वेळचा चॅम्पियन असलेला केकेआरचा संघ वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकतो. रिटेंशनच्या बाबतीत रसेल फ्रँचायझीची पहिली पसंती होता. केकेआरने त्यांचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि उपकर्णधार दिनेश कार्तिक यांना मेगा लिलावापूर्वी सोडले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)

विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच कर्णधारपद सोडले आहे तर एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी ग्लेन मॅक्सवेलला कर्णधार बनवू शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने माजी कर्णधार विराट कोहलीला 15 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलला 11 कोटी आणि मोहम्मद सिराजला 7 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

लखनऊ

सूत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुल नवीन आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करू शकतो. राहुलने वैयक्तिकरित्या PBKS ला त्याला न ठेवण्यास सांगितले होते.

अहमदाबाद

श्रेयस अय्यर आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात कोणताही खेळाडू अहमदाबादचे कर्णधार भुषवू शकतो. दिल्लीने अय्यरला संघातून हटवले आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला कायम ठेवलेले नाही. अशा परिस्थितीत मेगा लिलावात अहमदाबादच्या नजरा या खेळाडूंवर असतील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT