IPL 2022 Twitter/ @IPL
क्रीडा

IPL 2022: BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वेळापत्रक बदलणार?

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग 2022 मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल, याची पुष्टी खुद्द बोर्डाचे सचिव जय शाह यांनी केली होती. बीसीसीआय 27 मार्चपासून यंदाच्या हंगाम सुरू करणार होता. परंतु आता ती एक दिवस आधी म्हणजेच 26 मार्चपासून सुरू करण्याचा विचार केला जात आहे. आयपीएल ब्रॉडकास्ट करणाऱ्या स्टारची इच्छा आयपीएल 26 मार्चपासून सुरू करावे. यामुळेच बीसीसीआयने (BCCI) अद्याप आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

क्रिकबझने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार स्टारला आयपीएल 2022 (IPL 2022) ची सुरुवात डबल-हेडरने करायची आहे. अनेकदा उद्घाटन समारंभासह एकच सामना खेळवला जातो. त्यामुळे उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीही डबल हेडर सामना असाला अशी स्टारची इच्छा आहे. 27 मार्चला रविवार आहे, त्यामुळे 28 मार्च रोजी डबल हेडर सामने खेळता येणार नाही. म्हणूनच IPLचा 15वा हंगाम 26 मार्च म्हणजेच शनिवारी सुरू व्हावा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 मार्चला रविवारी डबल हेडर सामने खेळावेत अशी स्टारची इच्छा आहे. त्यामुळेच बीसीसीआयने अद्याप वेळापत्रक जाहीर केले नाही.

पहिल्या वीकेंडला 3 सामन्यांसह धमाका

शनिवारी हंगामाची सुरुवात धमाक्यात होईल. शनिवारी एक सामना आणि रविवारी लगेच डबल हेडर सामना होईल त्यामुळे याचा फायदा ब्रॉडकास्टर म्हणून स्टार होईल. रविवार म्हणजेच २७ मार्चला हंगाम सुरू झाला तर डबल हेडर सामना होणे अशक्य आहे. बीसीसीआय आणि ब्रॉडकास्ट चॅनल स्टार 26 मार्चला लीग सुरू करता येईल का यावर चर्चा करत आहेत. बीसीसीआय आणि स्टार यांच्यात एकमत झाले तर अर्थातच यंदाचा हंगामा 26 मार्चला सुरु होईल. याचं अंतिम वेळापत्रक बोर्ड लवकरच जाहीर करेल.

बीसीसीआयने आयपीएलच्या ठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ठिकाणाबाबत निर्णय घेताना कोरोना संसर्गाच्या प्रसाराची परिस्थिती विचारात घेतली जाईल. बीसीसीआय पुणे आणि मुंबई या महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये त्याचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या स्पर्धेसाठी वानखेडे, डीवाय पाटील स्टेडियम, पुण्याचे गहुंजे आणि ब्रेबॉर्न अशी चार मैदाने निश्चित केली आहेत. येथे सामने खेळले जाऊ शकतात, परंतु 10 संघांचे खेळाडू सराव कुठे करतील, त्यांच्या सुविधा कशा तयार होतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत एमसीए आराखडा तयार करत असल्याचे वृत्त आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

SCROLL FOR NEXT