IPL 2022 Saam TV
Sports

IPL चा मुद्दा विधानसभेत; '50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियमध्ये परवानगी द्या'

स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: आयपीएलसाठी वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय पाटील या स्टेडियममध्ये २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत आज मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईतील गावठाण, कोळवाडयातील प्रश्न अग्रक्रमाने मांडले.

तसेच याचवेळी त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांची लीज हे विविध विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. क्रिडा विभागावर बोलातना आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुंबईत होणा-या आयपीएल सामन्यांबाबतच्या एका मुद्याकडे लक्ष वेधले. या सामान्यांसाठी स्टेडियमध्ये २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एमसीएच्या वतीने याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत असून शासनाने २५ टक्के ऐवजी ५० टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तसेच मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नव खेळाडू तयार करण्यात येतात पण या मैदानांची खेळपट्टयांची लिज संपली असून शासनाने हे लिजचे तातडीने नुतनिकरण करावे अशी मागणी त्यांनी केली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT