Harshal Patelने मोडला सर्वात मोठा विक्रम; मलिंगा आणि बुमराहला टाकले मागे 
Sports

Harshal Patelने मोडला सर्वात मोठा विक्रम; मलिंगा आणि बुमराहला टाकले मागे

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. संघाच्या या शानदार खेळामध्ये वेगवान गोलंदाज हर्षल पटेलचे (Harshal Patel) महत्त्वाचे योगदान आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत एकूण 26 विकेट्स घेतल्या असून तो पर्पल कॅपचा (Purple Cap) मानकरी आहे. बुधवारी राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने अनेक विक्रम करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.

या सामन्यात हर्षलने चार षटकांत 34 धावा देऊन 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. यासह, त्याने स्पर्धेत 11 सामन्यांत एकूण 26 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या आवेश खानच्या तुलनेत 8 विकेट्स पुढे आहे. या सामन्यादरम्यान हर्षलने अनेक विक्रम केले. त्याने सर्वात जलद 25 विकेट्स घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगा आणि बुमराहला देखील मागे टाकले आहे.

बुमराह आणि मलिंगालाही टाकले मागे

हर्षलने फक्त 242 चेंडू टाकून आयपीएलमध्ये 25 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. असे करताना त्याने बुमराह आणि मलिंगाला मागे टाकले आहे. 244 चेंडू टाकल्यानंतर मलिंगाने हे यश मिळवले होते.

एका मोसमात सर्वाधिक विकेट्स

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत, हर्षल बुमराहच्या फक्त एक विकेट्स मागे आहे. मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने 27 विकेट्स घेतल्या होत्या तर हर्षलच्या 26 विकेट्स आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारनेही 2017 च्या मोसमात तितक्याच विकेट्स घेतल्या आहेत. जयदेव उनाडकट आणि हरभजन सिंग 24 विकेटसह संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहेत.

सर्वात यशस्वी अनकॅप्ड बॉलर

हर्षलने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि या मोसमात त्याने 26 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा तो अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. युझवेंद्र चहलने 2015 मध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. तर श्रीसंत (2011), सिद्धार्थ कौल (2018) ने 18-18 विकेट्स घेतल्या होत्या.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT