CSK vs RR: राजस्थानसाठी आजचा सामना 'करो या मरो'; चेन्नईचे पारडे जड Twitter
क्रीडा

CSK vs RR: राजस्थानसाठी आजचा सामना 'करो या मरो'; चेन्नईचे पारडे जड

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) मध्ये आज डबल हेडर होणार आहे. त्यातला दुसरा सामना आज संध्याकाळी, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. हा या हंगामाचा 47 वा सामना आहे. प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई हा पहिला संघ आहे, तर राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. या सामन्यासाठी राजस्थानच्या संघात मोठे बदल होणे अपेक्षित आहेत. कर्णधार संजू सॅमसन प्लेइंग -11 मध्ये शिवम दुबे आणि श्रेयस गोपालला संधी देण्याची शक्यता आहे.

रियान पराग आणि राहुल तेवतीया या दोघांनाही डच्चू मिळण्याची शक्यता आहे. हे दोघेही दुसऱ्या टप्प्यात विशेष काही करु शकले नाहीत. राजस्थान संघाला गेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 7 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. शेवटच्या सामन्यात त्यांनी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला आहे. अशा स्थितीत धोनीला त्याच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करणार नाही.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs RR Playing 11)

फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर आणि जोश हेजलवूड.

राजस्थान रॉयल्स

एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/ यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमर, रियान पराग/शिवम दुबे, राहुल तेवातीया/श्रेयस गोपाल, ख्रिस मॉरिस, कार्तिक त्यागी, चेतन साकारिया आणि मुस्तफिजुर रहमान.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT