IPL 2021: क्रिकेट प्रेमींना खुशखबर! मैदानात जावून सामना पाहता येणार  Twitter/@IPL
Sports

IPL 2021: क्रिकेट प्रेमींना खुशखबर! मैदानात जावून सामना पाहता येणार

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या १४ व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबर (रविवार) पासून सुरू होत आहे.

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या १४ व्या हंगामाचा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबर (रविवार) पासून सुरू होत आहे. स्पर्धा पुन्हा सुरू होण्याच्या फक्त 4 दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षक स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहू शकतात. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी (15 सप्टेंबर) आयपीएलच्या वेबसाइटवर याची घोषणा केली होती. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) भारतात पहिल्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध नव्हती. आयपीएलच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात दुबईमध्ये खेळला जाणार आहे. पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबईने या हंगामात मागील सामन्यात तीन वेळा चॅम्पियन चेन्नईचा पराभव केला.

आयपीएलने माहिती दिल्यानुसार प्रेक्षक 16 सप्टेंबरपासून स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांची तिकिटे खरेदी करू शकतात. ते www.iplt20.com तसेच PlatinumList.net वर तिकिटे खरेदी करू शकतील. स्पर्धेचे उर्वरित सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जाणार आहेत. या काळात, कोविड नियम आणि यूएई सरकारचे नियम लक्षात घेऊन मर्यादित जागांसाठी तिकिटे विकली जातील.

आयपीएलचा 14 वा हंगाम यावर्षी मे महिन्यात कोरोनामुळे स्थगीत झाला होता. मग आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाची प्रकरणे दिसू लागली. दुबईमध्ये चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामना त्यानंतर कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामना अबुधाबीमध्ये होणार आहे. त्यानंतर, 24 सप्टेंबर रोजी शारजामध्ये आरसीबी आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे. दुबईमध्ये 13, शारजाहमध्ये 10 आणि अबू धाबीमध्ये 8 सामने खेळले जातील.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT