PBKS vs RR: राजस्थानच्या प्लेईंग 11 मध्ये मोठा बदल तर पंजाबचा दिग्गज बाहेर
PBKS vs RR: राजस्थानच्या प्लेईंग 11 मध्ये मोठा बदल तर पंजाबचा दिग्गज बाहेर Twitter/ @IPL
क्रीडा | IPL

PBKS vs RR: राजस्थानच्या प्लेईंग 11 मध्ये मोठा बदल तर पंजाबचा दिग्गज बाहेर

वृत्तसंस्था

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. सर्व संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यातील सामना आज होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. मात्र, त्यानंतर संघाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. ते गेल्या दोन हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत. आयपीएल 2018 मध्ये त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे पंजाब किंग्ज त्यांच्या मागील कामगिरीवर सुधारणा करेल अशी अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी त्यांची सुरुवात खराब झाली होती पण नंतर चांगला कमबॅक केला होता. या दोन संघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 12 राजस्थान रॉयल्सने जिंकले आहेत आणि 10 पंजाब किंग्सने जिंकले आहेत. हे दोन संघ आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यात कधीही खेळलेले नाहीत. संजू सॅमसन आयपीएल 2021 मध्ये रॉयल्सचे नेतृत्व करत आहे. केएल राहुल या वर्षी पंजाब किंग्जचे कर्णधारपद कायम ठेवेल. आयपीएल 2021 च्या पूर्वार्धात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सचा 4 धावांनी पराभव केला.

पंजाबचा संघ

केएल राहुल (C/WK), मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, इशान पोरेल, फॅबियन अॅलन, हरप्रित ब्रार, अर्शदीप सिंग, आदिल रशीद, मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स

एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (c & wk), महिपाल लाॅमरोल, रियान पराग, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवातीया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, मुस्तफिसुर रहमान कार्तीक त्यागी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : भुईमूग व कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; अवकाळी आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका

Sharad Pawar News: 'लाचारीलाही मर्यादा असते,' जिरेटोप वादावरुन शरद पवार संतापले; प्रफुल पटेलांचा घेतला समाचार

Bhiwandi Constituency: राष्ट्रवादीने काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतली, निलेश सांबरेंचा शरद पवार गटावर निशाणा

Today's Marathi News Live : आज मुंबईत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता

Gold Ring: हाताच्या या बोटात घाला अंगठी; होईल धनलाभ

SCROLL FOR NEXT