IPL 2021  Twitter/ @IPL
क्रीडा

IPL 2021 च्या नियमावलीत मोठा बदल; मैदानावर खेळाडू होणार स्वावलंबी

आयपीएल (IPL 2021) संघांमध्ये कोविड -19 (COVID-19) विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 चा पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला होता.

वृत्तसंस्था

आयपीएल (IPL 2021) संघांमध्ये कोविड -19 (COVID-19) विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे आयपीएल 2021 चा पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला होता. यामुळे मंडळाचेही मोठे नुकसान झाले होते, परंतु आता त्याचा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) सुरु होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) कोविड-19 चे प्रोटोकॉल कडक केले आहेत. आता, आयपीएलच्या काही फ्रँचायझींनी माध्यामांना सांगितले की बीसीसीआयने अधिक कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या (IPL 2021 New Rules) आहेत. ज्यामुळे खेळाडूंना ड्रिंक-ब्रेक दरम्यान अन्नाप्रमाणेच पेयांच्या बाटल्या शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ खेळाडू त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, अन्नपदार्थ एकमेकांसोबत शेअर करू शकत नाहीत.

बीसीसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार

- कोणत्याही खेळाडूंने मैदानावर त्यांच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, टॉवेल एकमेकांसोबत शेअर करू नयेत.

- ब्रेक दरम्यान ड्रिंक घेऊन जाणाऱ्या खेळाडूंनी ड्रिंक्स बॉक्स मैदानावर ठेवणे आवश्यक आहे आणि सर्व खेळाडू फक्त त्यांच्या जून्या बाटल्या वापरू शकतात जेणेकरून शेअरिंग टाळता येईल.

- बीसीसीआयने फ्रँचायझींना खेळाडूंच्या नावाच्या बाटल्या पुरवण्यास सांगितले आहे.

- बीसीसीआयने संघांना खेळाडूंनी एकमेकांचे टॉवेल, कोणत्याही प्रकारचे कपडे वापरू नयेत असे निर्देश देण्यास सांगितले आहे.

- याव्यतिरिक्त, खेळाडूंचा मुक्काम ज्या हॉटेल परिसरासह असेल तिथले गोल्फ कोर्स वापरण्याची परवानगी दिली जाईल, संघाने संबंधित गोल्फ कोर्सची संपूर्ण बुक केला तरी चालणार आहे.

- गोल्फ क्लबमध्ये बार, रेस्टॉरंट्स, कॅफे, व्यायामशाळा, लॉकर रूम वापरण्याची परवानगी नाही.

Byदरम्यान, शनिवारी सांगितल्याप्रमाणे, आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वात मोठा नियम बॉल बदलण्याचा असेल. बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलसाठी जारी केलेल्या 46 पानांच्या आरोग्य सल्लागारानुसार, जर चेंडू स्टँडमध्ये गेला तर तो बदलला जाईल आणि पुनर्प्राप्तीनंतर मूळ चेंडू स्वच्छ करून बॉल लायब्ररीमध्ये ठेवला जाईल.

कोरोना संबंधीत प्रोटोकॅाल नियम

- सर्व संघातील सदस्य कोरोनाची RT-PCR चाचणी करतील, उड्डाणाच्या वेळेपासून ७२ तास जुने निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे.

- आरटी-पीसीआर चाचणीनंतर सर्व सदस्यांना स्वतंत्रपणे विलगिकरणात ठेवणे आवश्यक आहे.

- भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या खेळाडूंना कोविड -19 पीसीआर अहवालात पडताळणी प्रक्रियेसाठी मूळ अहवालाशी जोडलेला क्यूआर कोड समाविष्ट करणे अनिवार्य आहे.

- फ्रँचायझीचा सदस्य किंवा कुटुंबातील सदस्य आवश्यक असेल तरच बायो बबलमधून बाहेर पडू शकतो. तथापि, अनियोजित भेटींसाठी बबलमधून बाहेर जाण्यापूर्वी बीसीसीआयच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल.

- बायो बबलमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी, सदस्याला 6 दिवस विलगिकरणात राहणे आवश्यक आहे. या दरम्यान, आरटी-पीसीआर चाचण्या दुसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या दिवशी केल्या जातील, ज्यामध्ये सदस्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असावा.

- जर कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचे असेल तर अशा परिस्थितीत ग्रीन कॉरिडॉर तयार होईल. हे सुनिश्चित केले जाईल की या परिस्थितीत सदस्य कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT