PBKS vs RR: 22 धावा अन् KL Rahul ठरणार 'असे' करणारा दुसरा खेळाडू Twitter/ @PBKS
Sports

PBKS vs RR: 22 धावा अन् KL Rahul ठरणार 'असे' करणारा दुसरा खेळाडू

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यात आज एक अद्भुत सामना पाहायला मिळणार आहे. दोन युवा कर्णधार आमनेसामने येणार आहेत.

वृत्तसंस्था

PBKS vs RR: आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यात आज एक अद्भुत सामना पाहायला मिळणार आहे. दोन युवा कर्णधार आमनेसामने येणार आहेत. आयपीएलचा पहिला टप्पा केएल राहुल (KL Rahul) आणि संजू सॅमसनसाठी (Sanju Samson) चांगला नव्हता. पण दुसऱ्या टप्प्यात दोघेही जोरदार पुनरागमन करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरणार आहेत. आजच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलही मोठा विक्रम रचू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम फॉर्ममध्ये असलेला केएल राहुल 22 धावा केल्याबरोबर आयपीएलमध्ये 3 हजार धावा पूर्ण करु शकतो.

राहुलने आयपीएलमध्ये 88 सामन्यांत 79 डावांमध्ये 2978 धावा केल्या आहेत. जर त्याने आज तीन हजार धावा पूर्ण केल्या, तर तो आयपीएलमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल. आयपीएलमध्ये सर्वात जलद 3 हजार धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये 75 डावांमध्ये 3,000 धावा केल्या आहेत. केएल राहुलने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 7 सामन्यांमध्ये 331 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 66.20 आहे. त्याने पहिल्या टप्प्यात 4 अर्धशतके देखील केली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 धावा आहे. गेल्या काही हंगामात, केएल राहुल आयपीएलमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक बनला आहे.

2020 च्या आयपीएल हंगामात, या खेळाडूने 14 सामन्यांमध्ये 55.83 च्या प्रभावी सरासरीने 670 धावा केल्या होत्या. यादरम्यान, त्याच्या त्याने शानदार शतकही झळकावले होते. त्याचबरोबर 2019 च्या IPL हंगामात राहुलने 14 सामन्यांमध्ये 593 धावा आणि 2018 च्या IPL हंगामात 14 सामन्यांमध्ये 659 धावा केल्या होत्या. मात्र, कर्णधारपदाखाली राहुल काही विशेष करू शकला नाही. या मोसमात आतापर्यंत त्याच्या संघाने 8 सामने खेळले आहेत. या 8 सामन्यांमध्ये संघाला 5 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर संघाने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी पंजाबला आगामी सर्व सामन्यांमध्ये जिंकण्याबरोबरच चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT