rahul dravid with rohit sharma saam tv
Sports

Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

India's preparation for ODI World Cup 2023: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. वाचा सविस्तर आढावा.

Ankush Dhavre

Team India Challenges Before World Cup 2023:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेतील सर्व सामने भारतात रंगणार आहेत.

वर्ल्डकप स्पर्धा सुरू व्हायला केवळ ५७ दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजुनही भारतीय संघाला आपली परफेक्ट प्लेइंग ११ निवडता आलेली नाही. त्यामुळे नक्कीच भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली असणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि राहूल द्रविडसमोर काही प्रश्न असणार आहेत, ज्याची उत्तरे या दोघांना मिळून शोधावी लागणार आहे.

सलामीला कोण जाणार?

भारतीय संघाला येत्या काही दिवसात आशिया चषक आणि वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत .मात्र अजुनही भारतीय संघासाठी डावाची सुरूवात कोण करणार हे कळू शकलेलं नाही.

वेस्टइंडीजविरूद्धच्या मालिकेसाठी रोहित आणि विराटला विश्रांती देण्यात आली आहे. तर ईशान किशन आणि शुबमन गिल हे दोघेही डावाची सुरूवात करताना दिसून येत आहेत. जर रोहित शर्मा सलामीला येणार असेल तर,ईशान किशनवर प्रयोग का सुरू आहे?

मध्यक्रमात कोणाला मिळणार संधी?

टॉप ऑर्डरचे फलंदाज डगमगले तर मध्यक्रमात कोण जबाबदारी घेणार? या प्रश्नाचं उत्तर देखील भारतीय संघाला शोधावं लागणार आहे. कारण वेस्टइंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यांमध्ये वेगवेगळ्या फलंदाजांना संधी दिली गेली आहे. मात्र कोणालाच समाधानकारक कामगिरी करता आली नाही.

तसं पाहायला गेलं तर विराट कोहली, रोहित शर्मा,शुबमन गिल, श्रेएस अय्यर हे टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. जर ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला आले तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

जर श्रेएस अय्यर फिट होऊन परतला तर तो चौथ्या क्रमाकांवर फंलदाजीला येऊ शकतो. जर तो फिट नसेल तर त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते .

कोणत्या गोलंदाजांना मिळणार संधी?

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला असुन तो आयर्लंडविरूद्धच्या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं प्रतिनिधित्व करताना दिसून येऊ शकतात.

तर हार्दिक पंड्या चौथ्या गोलंदाजाची भुमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो. तर राखीव खेळाडू म्हणून शार्दुल ठाकुरची निवड केली जाऊ शकते. (Latest sports updates)

फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. तसेच युजवेंद्र चहलचा देखील संघात समावेश केला जाऊ शकतो.

असा असेल संघ..

सलामीवीर फलंदाज: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल.

मध्यक्रम: विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव/केएल राहुल.

यष्टीरक्षक: ईशान किशन आणि संजू सॅमसन.

अष्टपैलू खेळाडू: हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा

वेगवान गोलंदाज: मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

फिरकी गोलंदाज: कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT