Asia Cup Saam TV
Sports

Cricket News: Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात! टीम इंडिया स्पर्धेतून घेणार माघार?

Asia Cup 2023: भारतीय संघ पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यासाठी जाणार का?

Ankush Dhavre

Asia cup 2023 update: यावर्षी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे.

त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यासाठी जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

एका माध्यमातील वृत्तामध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेचे आयोजन कधी आणि कुठे केले जाणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानातच होणार. (Latest sports updates)

मात्र भारतीय संघ पाकिस्तानात सामना खेळण्यासाठी जाणार नाही. भारतीय संघाचे सामने दुसऱ्या देशात खेळवले जाणार आहेत.

या वृत्तात असे म्हटले गेले आहे की, हे सामने युएई, श्रीलंका, ओमान किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जाऊ शकतात. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

आशिया चषक स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये केले जाऊ शकते. कारण यापूर्वी देखील दोन्ही संघ याच मैदानावर आमने सामने आले आहेत. ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी युएईचे वातावरण गरम असते.

उष्णतेचा पारा ४० डिग्रीच्या आसपास असतो. यापूर्वी देखील आयपीएल स्पर्धचे आयोजन सप्टेंबर महिन्यात केले गेले होते. ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली गेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT