Yashasvi Jaiswal twitter/bcci
क्रीडा

Yashasvi Jaiswal Century: मुंबईकर जयस्वालचं यशस्वी शतक! तुफानी खेळी करत मोडले 'हे' मोठे रेकॉर्डस्...

Records Made By Yashasvi Jaiswal: आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या यशस्वी जयस्वालने तुफानी शतक झळकावले आहे

Ankush Dhavre

IND VS WI 1st Test: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला आहे. दरम्यान आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या यशस्वी जयस्वालने तुफानी शतक झळकावले आहे. यासह मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. (Yashasvi Jaiswal Century)

संधीचं केलं सोनं..

वेस्टइंडीजविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी यशस्वी जयस्वालला संघात स्थान दिलं आहे. तर पहिल्याच सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करत त्याने तुफानी शतकी खेळी केली आहे. या डावात त्याने २१५ चेंडूंचा सामना शतकी खेळी केली आहे. यादरम्यान त्याने ११ चौकार मारले आहेत. (Yashasvi Jaiswal Records)

पदार्पणात झळकावलं शतक..

यशस्वी जयस्वालने पदार्पणात शतक झळकावत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा १७ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. या यादीत श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, प्रवीण आम्रे आणि मोहम्मद अझहरुद्दीनसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.(Latest sports updates)

रोहितसोबत विक्रमी भागीदारी..

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी मिळून विक्रमी भागीदारी केली आहे. दोघांनी मिळून २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. यासह या जोडीने वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवागच्या जोडीचा वेस्टइंडीजमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम मोडून काढला आहे. या दोघांनी २००६ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात १५९ धावांची भागीदारी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT