Virat Kohli Cricket Form Instagram/@virat.kohli
Sports

....तेव्हाही दिग्गज खेळाडूंना ड्रॉप केलं जायचं, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं कोहलीबाबत मोठं विधान

एरव्ही रनमशीन असलेला विराट कोहली इंग्लंडच्या सीरिजमध्येही फेल ठरला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारताने आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन टी-२० सामन्यांची सीरिज झाली. भारताने दोन टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवल्याने सीरिजवर विजयाचा झेंडा फडकवला. परंतु, भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (virat Kohli) इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्येही धावांसाठी संघर्ष करताना दिसला. एरव्ही रनमशीन असलेला विराट इंग्लंडच्या सीरिजमध्येही फेल ठरला आहे. विराट कोहली आणि मैदानावर धावांचा पाऊस, असं काहिसं समीकरण गेल्या काही वर्षांपासून जुळलं असल्याचं क्रिकेटप्रेमींनी मैदानावर पाहिलं आहे.

परंतु, विराटसाठी आताच्या घडीला कठीण काळातून (virat kohli out of form) जात असून त्याच्या फॉर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. एक काळ असा होता, ज्यावेळी तुमच्या प्रतिष्ठेचा विचार न करता आऊट ऑफ फॉर्म असल्याने टीममधून ड्रॉप केले जायचे, असं म्हणत प्रसाद यांनी नाव न घेता विराटवर टीप्पणी केली आहे.

Venkatesh Prasad

व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं की, पूर्वीचा काळ असा होता की, तुम्ही स्टार खेळाडू असले, पण तुम्ही आऊट ऑफ फॉर्म असल्यास तुम्हाला टीममधून बाहेर काढलं जातं. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग,युवराज सिंग,जहीर खान, हरभजन सिंग या सर्वांना ड्रॉप केलं गेलं आहे. जेव्हा हे दिग्गज खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते तेव्हा त्यांनी पुन्हा घरेलू क्रिकेटमध्ये धावा केल्या.त्यानंत या सर्वांनी टीम इंडियामध्ये पुन्हा पुनरागमन केलं.

अनिल कुंबले यांनाही ड्रॉप केलं होतं

आता पारिस्थिती बदलली आहे. आता आऊट ऑफ फॉर्म असल्यावर तुम्हाला विश्रांती दिली जाते. पुढे जाण्यासाठी हा विकल्प योग्य नाही आहे. देशात खूप टॅलेंट आहे आणि तु्म्ही फक्त नावासाठी खेळू शकत नाही. भारताचे सर्वोत्कृष्ठ मॅच विनर अनिल कुंबले यांनाही अनेकदा टीम इंडियातून बाहेर केलं होतं, असंही प्रसाद यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. दरम्यान, विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून धावांसाठी संघर्ष करत आहे. विराटने इंग्लंडच्या विरुद्ध दोन टी-२० सामने खेळले. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात विराटने फक्त एक धाव आणि तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ११ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

Zodiac Signs Astro Tips: 'या' राशींच्या व्यक्ती असतात फार तापट स्वभावाच्या; पाहा तुमची रास यात आहे का?

Mumbai University Exam: मुंबई विद्यापीठाच्या 32 परीक्षा पुढे ढकलल्या; या तारखेला घेण्यात येणार | VIDEO

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT