Shikhar Dhawan At Mahakal Temple Ujjain Saam tv
क्रीडा

Shikhar Dhawan Visited Mahakal: वर्ल्डकप संघातून वगळलेल्या गब्बरची महाकाल दरबारी हजेरी! VIDEO तुफान व्हायरल

Shikhar Dhawan At Mahakal Temple Ujjain: शिखर धवनने महाकाल दरबारी हजेरी लावली आहे.

Ankush Dhavre

Shikhar Dhawan Visited Mahakal Temple:

यंदा भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात कर्णधार रोहित शर्मा आणि युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलला संघात स्थान दिलं गेलं आहे.

तर अनुभवी फलंदाज शिखर धवनला यावेळी देखील संघाबाहेर राहावं लागलं आहे. दरम्यान संघाबाहेर असताना शिखर धवनने उज्जैनच्या महाकाल दरबारी हजेरी लावली आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar Birthday) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करतोय.या खास दिवशी अक्षय कुमारने आपल्या कुंटुंबासह महाकाल दरबारीह हजेरी लावली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

अक्षय कुमारसोबत त्याची बहीण अलका हिरानंदानी, मुलगा आरव आणि भाची सिमर हे देखील उपस्थित होते. अक्षय कुमारने आपल्या आगामी चित्रपटासाठी प्रार्थना केली. तर शिखर धवन देखील यावेळी भक्तित तल्लीन होताना दिसून आला आहे.

धवन भस्न आरतीत सहभागी झाला होता.तर काही वेळाने प्रसिद्ध टेनिसपटू सायना नेहवालने भोग आरतीत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

या आरतीत तुम्ही पाहू शकता की, अक्षय कुमारचं कुंटुंब आणि शिखर धवन महाकालच्या आरतीत मग्न आहेत. अक्षयने केशरी रंगाचा धोतर-सोला आणि आरवने पांढरा कुर्ता-पायजम घातला आहे. तर शिखर धवनने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट परीधाण केली आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकपसाठी नाही झाली निवड..

शिखर धवन हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. वर्ल्डकप स्पर्धा सुरू असताना चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे. असं म्हटलं जात होतं की, शिखर धवनची या संघात कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते.

मात्र त्याला या संघात देखील स्थान मिळालं नव्हतं. तसेच वनडे वर्ल्डकपसाठी संघाची निवड करताना देखील शिखर धवनचा उल्लेख करण्यात आला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT