India won against Australia  Saam Tv
क्रीडा

चमत्कारच! ऑस्ट्रेलियाच्या हातून खेचला सामना, भारताचा विजय या ५ कारणांमुळं झाला, नक्की वाचा!

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करून विजयाच्या दिशेनं कूच केली, पण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी चमकदार कामगिरी केलीय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज वार्म अपचा सामना रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 187 धावांचं आव्हान दिलं होतं. हे तगडं आव्हान गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करून विजयाच्या दिशेनं कूच केली.

मात्र, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) शेवटच्या षटकात चार विकेट्स घेतल्यानं ऑस्ट्रेलियाचा निसटता पराभव झाला. ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चितच होता, मात्र शमीच्या भेदक गोलंदाजीपुढं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 180 धावाच केल्यानं भारताने सहा धावांनी या सामन्यात विजय मिळवला. (India won against Australia in warm up match t20 world cup)

के एल राहुलचं अर्धशतक

भारताचा सलामीवीर फलंदाज के एल राहुलने (K l Rahul) पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे भारताने पॉवर प्ले मध्ये बिनबाद 69 धावा कुटल्या. सहा षटकानंतर जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) 9 चेंडूत केवळ 13 धावांवर खेळत होता. त्याचदरम्यान राहुलने 27 चेंडूत 50 धावा करून अर्धशतक ठोकलं होतं. राहुलच्या 57 धावांच्या आक्रमक खेळीमुळं भारत 186 धावांवर पोहोचला.

सूर्यकुमार पुन्हा तळपला

के एल राहुल बाद झाल्यानंतर कोणताच फलंदाज भागिदारी करत नव्हता. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवने भारताची कमान सांभाळली. शेवटच्या षटकात त्याने अर्धशतक ठोकलं. त्यामुळे भारताच्या धावसंख्येचा आलेख वाढला. सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. या इनिंगमध्ये त्याने सहा चौके आणि एक षटकार ठोकला. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा भारतासाठी चमकदार कामगिरी केली.

हर्षल पटेलचा 19 वा षटक

शेवटच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी 16 धावांची गरज होती. त्यावेळी 19 वं षटक हर्षल पटेलला देण्यात आलं आणि त्याने अवघ्या पाच धावा देत एक विकेट घेतली. हर्षलने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फिंचच्या दांड्या गुल केल्या. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फिंचला बाद केल्यामुळं भारताने विजयाच्या दिशेनं वाटचाल केली.

शमीची शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. कर्णधार रोहित शर्माने शेवटचं षटक मोहम्मद शमीला दिलं आणि संपूर्ण खेळंच पालटला. शमीच्या या षटकात पहिल्या दोन चेंडूवर चार धावा दिल्या. त्यानंतरच्या चेंडूवर शमीनं पॅट कमिन्सला बाद केलं. षटकातील चौथ्या चेंडूवर कार्तिक आणि शमीनं एगरला धावबाद केलं. त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूवर शमीनं सटीक यॉर्कर टाकून जॉश इंग्लिस आणि फिर रिचर्डसनला बाद केलं. शमीनं पहिल्या आणि शेवटच्या षटकात चार धावा दिल्या.

कोहलीची फिल्डिंग

विराट कोहलीने या सामन्यात बॅटने धावांचा पाऊस पाडला नाही. परंतु, कोहलीने या सामन्यात जबरदस्त फिल्डिंग केली. कोहलीने 19 व्या षटकात डायरेक्ट हिट करून जॉश इंग्लिसला धावबाद केलं. तसंच शेवटच्या षटकात कमिन्सने लॉंग ऑनवर मोठा फटका मारला, त्याचदरम्यान कोहलीने बाऊंड्री लाईनवर अप्रतिम फिल्डिंग करून कमिन्सचा झेल पकडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवायचे तर 'या' घरगुती टिप्स फॅालो करा

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची अख्ख्या महाराष्ट्राला साद; एकदा सत्ता हातात देऊन बघा!

Bengaluru Accident: बेंगळुरूच्या रस्त्यावर थरार, आलिशान कारनं तरुणीला उडवले

OYO हॉटेलचा फूल फॉर्म तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT