Indian Cricket Team saam tv
Sports

IND vs SA Series : दीपक हुड्डा आफ्रिका मालिकेतून बाहेर, 'या' तीन खेळाडूंना मिळाली संधी

दोन्ही संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रंगणार आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका घरेलू मैदानावर आजपासून सुरु होत आहे. त्यानंतर या दोन्ही संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना आज २८ सप्टेंबरला तिरुवनंतपूरम येथे होणार आहे. मात्र, सामना सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दिग्गज खेळाडू दीपक हुड्डा (Deepak Hooda) दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडला आहे. तर अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने याआधीच संघाच्या बाहेर आहे. (India vs South africa first T-20 match latest update)

'या' तीन खेळाडूंचा संघात समावेश

दक्षिण आफ्रीका विरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तीन दिग्गज खेळाडूंचा या संघात समावेश नसणार आहे. हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती दिलीय. त्यामुळे या तीन खेळाडूंच्या जागेवर उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमदचा स्क्वॉडमध्ये समावेश केला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर दिली आहे.

बीसीसीआयने हुड्डाबद्दल दिली अपडेट

दीपक हुड्डाला पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आता नॅशनल क्रिकेट अकॅडमीत रिपोर्ट करायचं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दीपक हुड्डा खेळणार नाही,त्याला पाठीच्या दुखापतीमुळं एनसीएमध्ये रिपोर्ट करावं लागणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने रविवारीच दिली होती.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध आज २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे पहिला टी-२० सामना होणार आहे. भारत विरुद्ध आफ्रिका हा दुसरा टी-२० सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. तर ४ ऑक्टोबरला शेवटचा टी-२० सामना इंदौरला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ६ ऑक्टोबरला लखनौ, ९ ऑक्टोबरला रांची आणि ११ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

पहिला टी-२० सामना : २८ सप्टेंबर (तिरुवनंतपुरम)

दुसरा टी-२० सामना : २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा टी-२० सामना : ४ ऑक्टोबर ( इंदौर )

पहिला एकदिवसीय सामना : ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा एकदिवसीय सामना : ९ ऑक्टोबर (रांची )

तिसरा एकदिवसीय सामना : ११ ऑक्टोबर (दिल्ली)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन,युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह,हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव,श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT