Indian Cricket Team saam tv
Sports

....तर भारत यशाचं 'शिखर' गाठणार, पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडण्याची भारताला संधी

जर भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरोधात रविवारी होणाऱ्या सामन्यातही विजय संपादन केलं, तर....

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन धावांनी विजय मिळवला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिज (West Indies) विरोधात १-० ने आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा दुसरा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील सर्व सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या स्टेडियम मध्ये क्विंस पार्क ओवलमध्ये खेळवले जात आहेत. दरम्यान, रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानचा (Pakistan big record) मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. एका संघाविरुद्ध सलग द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या विक्रमाला गवसणी घालण्याचा भारताचा उद्देश आहे.

जर भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या विरुद्ध रविवारी होणारा सामन्यातही विजय संपादन केलं, तर २-० ने भारताची आघाडी होईल. त्यामुळे भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध सलग १२ वी द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची नोंद होईल. त्यामुळे एका संघा विरोधात सलग १२ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर होईल. सध्या भारत आणि पाकिस्तानच्या नावावर ११-११ सीरिज जिंकण्याची नोंद आहे. दोन्ही संघ बरोबरीत असल्याने भारताला पाकिस्तानचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

२००७ पासून आतापर्यंत भारताचा पराभव झाला नाही

टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध आतापर्यंत सलग ११ वेळा द्विपक्षीय मालिका जिंकली आहे. भारताचा मे २००६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पराभव झाला होता. त्यानंतर जानेवारी २००७ पासून एकदिवसीय मालिका जिंकण्याचे सत्र भारताने सुरुच ठेवले. यावेळी शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने जर दुसऱ्या सामन्यातही विजयाची मोहोर उमटवली, तर भारत पाकिस्तानचा विक्रम मोडून अव्वल स्थान पटकावेल.

एका संघाविरुद्ध सर्वात जास्त एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम

११ वेळा भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला. (२००७ पासून आतापर्यंत)

११ वेळा पाकिस्तानने झिम्बाब्वेचा पराभव केला. (१९९६ पासून आतापर्यंत )

१० वेळा पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केला. ( १९९६ पासून आतापर्यंत )

९ वेळा दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पराभव केला. (१९९५ पासून आतापर्यंत )

९ वेळा भारताने श्रीलंकेचा पराभव केला. (२००७ पासून आतापर्यंत )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT