rohit sharma saam tv
Sports

IND vs PAK: पाकिस्तानची भेदक गोलंदाजी; रोहित शर्माचा पाठलाग, कॅमेरामनवर भडकला, पाहा Video

IND vs PAK: क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा कॅमेरामनवर संतापलेला दिसला.

Vishal Gangurde

India Vs Pakistan Match News:

क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा कॅमेरामॅनवर संतापलेला दिसला. रोहित शर्माचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (Latest Marathi News)

आज क्रिकेट आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) सामन्यात भारत-पाकिस्तानचा (India-Pakistan) सामना होत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय संघाची (Team India) सुरुवात खराब झाली. त्यात खेळादरम्यान पाऊस झाला. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागे-मागे येत फुटेज घेणाऱ्या कॅमेऱ्यावर संतापला. सामन्याचे पाचवे षटक चालू असताना पावसाला सुरूवात झाली.

नेमकं काय घडलं?

पाचव्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला जात असताना सामना थांबवण्यात आला. पावसामुळे क्रिकेटचा सामना जेव्हा थांबवण्यात आला. तेव्हा रोहित शर्मा डग आऊटमध्ये बसलेला होता. आपल्या खेळाडूंशी चर्चा करत होता. त्यानंतर काही वेळाने पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा चालू करण्यात आला.

तेव्हा शुभमन गिल आणि रोहित यांनी हेल्मेट डोक्यावर परिधान केलं होतं. याच दरम्यान एका कॅमेरामॅनची नजर रोहित शर्मावर होती आणि तो रोहितचे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपू लागला. परंतु रोहित शर्माला हे आवडलं नाही. त्याने कॅमेरामॅनला कॅमेरा दुसरीकडे करायला लावला. शूट करू नका, असं रोहित सांगत होता. यावेळी रोहित शर्मा संतापलेला होता.

रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडिया खूप व्हायरल होतोय. आजच्या सामन्यात भारतीय संघाची सुरूवातीची फलंदाजी खराब झाली. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघाची सलामीची जोडी चांगली फलंदाजी करू शकली नाही.

पाकिस्तानचा भेदक गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहितला बाद केलं. पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीनने रोहितचा त्रिफळा उडवला. यानंतर कोहलीही बाद झाला. तर हारिस रऊफने श्रेयस अय्यरला १४ धावांवर बाद केलं. रोहितने ११ धावा केल्या तर विराट कोहली फक्त ४ धावा करू शकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT