Indian Cricket Team saam TV
Sports

T20 World Cup Squad Change : टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच बदलणार? काय असू शकतं कारण?

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाने स्क्वॉडची घोषणा केली आहे, पण...

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासोबत दुसऱ्या संघांनीही टी-२० विश्वचषकासाठी त्यांच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. आगामी विश्वचषक सुरू होण्यासाठी काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे स्क्वॉड बदलण्याची संधी आहे. आयसीसीच्या नियमानुसार, १५ ऑक्टोबरपर्यंत संघामध्ये बदल केले जाऊ शकतात. (Indian cricket team latest news update)

टी-२० विश्वचषक सुरु होण्यासाठी आता फक्त दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियात आगामी होणाऱ्या विश्वचषकासाठी (T-20 World Cup) १६ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. टीम इंडियाने त्यांच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. मात्र,दुखापतीच्या कारणास्तव भारताला मोठे धक्के बसत आहेत. टीम इंडियाला आताही त्यांच्या स्क्वॉडमध्ये बदल करण्याची संधी आहे. ऐनवेळी काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० चषकासाठी टीम इंडियात संधी मिळू शकते.

टीम इंडियात 'असा' केला जाऊ शकतो बदल

आयसीसीच्या नियमानुसार, टीम इंडियात ९ ऑक्टोबरपर्यंत टी-२० विश्वचषकाच्या स्क्वॉडमध्ये बदल करू शकते. तसच जे संघ सुपर १२ मध्ये पोहोचले आहेत. त्यांच्याकडे १५ ऑक्टोबरपर्यंत ही संधी असणार आहे. म्हणजेच टीम इंडिया १५ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या स्क्वॉडमध्ये बदल करू शकते. जर त्यानंतरही काही बदल घडले, तर भारतीय संघ आयसीसीकडून विशेष परवानगी घेवून त्यांच्या स्क्वॉडमध्ये बदल करू शकते.

खेळाडूंच्या दुखापतीमुळं टीम इंडियाला मोठा धक्का

टी-२० विश्वचषकासाठी जेव्हा टीमची घोषणा केली, त्यानंतर टीम इंडियाला मोठे धक्के बसले. सर्वात पहिले रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर दिपक हुड्डाला दुखापत झाली. या दोन्ही खेळाडूंचा दुखापतीमुळे टीम इंडियात समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर टीम इंडियचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळं विश्वचषकाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते?

टी-२० विश्वचषकासाठी भारताने १५ खेळाडूंची घोषणा केली आहे. याचसोबत चार खेळाडूंना स्टॅंडबायवर ठेवण्यात आले आहेत. जर स्क्वॉडमध्ये बदल झाला, तर या चार खेळाडूंपैकी कुणालाही संधी दिली जाऊ शकते. यामध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे. या खेळाडू व्यतिरिक्त संजू सॅमसन, इशान किशन यांची नावं आघाडीवर आहेत.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर),दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या, आर. आश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्षदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT