यंदाचा वर्ल्डकप भारतात रंगणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. तर भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघ नुकताच आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवून आला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. १९८३ आणि २०११ नंतर भारतीय संघ यंदा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला? जाणून घ्या.
एका मुलाखतीदरम्यान रोहित शर्मा वर्ल्डकप जिंकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी उत्तर देताना तो म्हणाला की, 'माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. मी अशी आशा करतो की, या स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू फिट आणि तंदुरूस्त राहतील. यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. संघातील खेळाडूंनी चांगल्या वातावरणात राहवं हे खुप महत्वाचं आहे.'
वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरलं होतं.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. (Latest sports updates)
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाबाबत बोलताना म्हणाला की' कर्णधारपदाबद्दल माझे विचार वेगळे आहेत. माझ्या मते कर्णधार महत्वाचा नसून इतर १० खेळाडू जास्त महत्वाचे आहेत. कारण तुम्हाला त्या १० खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घ्यायची असते.'
रोहित शर्मा पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. त्याच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर,त्याने वनडे क्रिकेटमध्ये १३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान भारतीय संघाने ११ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.