rohit sharma  twitter
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहितला पाकिस्तानात जावं लागणार; मोठं कारण आलं समोर

Rohit Sharma, ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानात केले जाणार आहे. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ही घोषणा झाल्यापासून एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआयने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्यासाठी पूर्ण जोर लावला.

अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला बीसीसीआयसमोर झुकावं लागलं. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि युएईमध्ये करण्यात आले आहे. मात्र तरीसुद्धा रोहितला पाकिस्तानला जावं लागेल.

पाकिस्तान मीडियाने असा दावा केलं आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्माला पाकिस्तानात यावंच लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी सर्व कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतील. त्यासाठी इतर कर्णधारांसह रोहितलाही पाकिस्तानात हजर राहावं लागेल. मात्र रोहित खरचं पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि भारतीय संघाचे सामने युएईत खेळवले जाणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर पुढील सामना २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

असं आहे संपूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT