Rohit sharma twitter
Sports

WTC Final 2023: WTC च्या अंतिम सामन्यात पराभूत होताच रोहित शर्मा ICC वरच भडकला! म्हणाला...

Rohit Sharma Statement: पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने मोठे वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी गमावली आहे. न्यूझीलंड संघाकडून अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाकडून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने मोठे वक्तव्य केलं आहे.

या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मावर प्रश्नांचा पाऊस पडला. त्याने एकूण एक प्रश्नाचं उत्तर दिलं. तसेच आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

त्याने म्हटले की, 'मला अंतिम सामन्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला नक्कीच आवडेल. आम्ही इथपर्यंत पोहचण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. आम्ही चांगली लढत देखील दिली. मात्र आम्हाला केवळ एकच सामना खेळायला मिळाला. मला आगामी स्पर्धेत ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायला नक्कीच आवडेल.' (Latest sports updates)

२०२५ स्पर्धेचा अंतिम सामना देखील इंग्लंडमध्येच..

आयसीसीने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात केली आहे. २०१९-२१ हंगामासाठी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

हा सामना साऊथहॅम्पनच्या मैदानावर पार पडला होता. तर २०२१-२३ स्पर्धेतील अंतिम सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लगला आहे.

आता पुढचा अंतिम सामना कुठे होणार यबाबाबत आयसीसीने घोषणा केली आहे. २०२३-२५ हंगामाचा अंतिम सामना देखील इंग्लंडमध्येच रंगणार आहे. हा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाचा डाव अवघ्या २३४ धावांवर संपुष्ठात आला आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची संधी गमावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT