टाेकियाे : येथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत आज सकाळी नेमबाज अवनी लेखारा, अॅथलिट याेगेश कठुनिया यांनी मिळविलेल्या यशानंतर भालाफेक क्रीडा प्रकारात देवेंद्र झाझरिया आणि सुंदरसिंग Devendra Jhajharia Sundar Singh Gurjar या भारतीय खेळाडूंनी उज्जवल कामगिरी केली.
देवेंद्र झाझरिया याने ६४.३५ मीटर अंतरावर भाला फेकमध्ये उत्तम कामगिरी करुन रौप्य पदकावर शिक्का माेर्तब केला. खरंतर देवेंद्रकडून यंदा सुवर्ण कामगिरीची अपेक्षा हाेती. यापुर्वी त्याने दाेन सुवर्णपदक पटकाविली आहेत. ४० वर्षीय देवेंद्रचे हे पॅरालिंपकमधील तिसरे पदक आहे.
भाला फेक क्रीडा प्रकारात सुंदर सिंह गुर्जरची फेकी ६४.०१ मीटर इतकी नाेंद झाली. ताे स्पर्धेत कांस्यपदकाचा मानकरी ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या पदकांमुळे साेमवारची सकाळ क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहवर्धक ठरली आहे.
आज सुरुवातीलाच देशाच्या खात्यात चार पदकांची भर पडल्याने भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र माेदींसह देशातील अनेक नेते, क्रीडापटू, अभिनेते समाज माध्यमातून अभिनंदन करीत आहेत. आगामी क्रीडा प्रकारात आपले खेळाडू उज्जवल कामगिरी करतील असे आत्मविश्वासाने समाज माध्यमातून नमूद करीत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.