Who Will Face India in Semi Final saam tv
Sports

Champions Trophy 2025: ऑस्ट्रेलिया नकोच नको! सेमी फायनलमध्ये टाळण्यासाठी रोहित शर्माला लढवावी लागणार शक्कल, कसं आहे गणित?

Who Will Face India in Semi Final, Champions Trophy 2025: भारत आणि न्यूझीलंड यांनी गट ए मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी ग्रुप बी मधून टॉप-४ मध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत टीम इंडियाचा सामना कोणत्या टीमशी सामना होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असून आज भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई यांच्यात खेळवली जातेय. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून टॉप-४ म्हणजेच सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या चारही टीम्सची नावं निश्चित झाली आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांनी गट ए मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी ग्रुप बी मधून टॉप-४ मध्ये प्रवेश केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे दोन्ही सेमीफायनलचे सामने ४ आणि ५ मार्च रोजी खेळवले जाणार आहेत. पहिला सामना ४ मार्च रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. तर या स्पर्धेत टीम इंडियाचा सामना कोणत्या टीमशी सामना होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

कोणाशी होणार टीम इंडियाचा सामना?

खरंतर, सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कोणाशी सामना करेल याचा निर्णय रोहित शर्मा आणि त्याची टीमवर अवलंबून असणार आहे. यामध्ये आज न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप-ए सामन्याच्या निकालावर हे ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गट अ मधील टॉप-२ टीम्सचे (भारत आणि न्यूझीलंड) स्थान अद्याप निश्चित झालेलं नाही. आज होणाऱ्या सामन्यानंतर, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल हे निश्चित केलं जाणार आहे.

कसं आहे गणित?

नियमांनुसार, पहिल्या उपांत्य फेरीत गट अ मधील अव्वल टीम दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या टीमशी सामना करेल. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत, गट अ मधील दुसऱ्या क्रमांकाची टीम गट ब मधील अव्वल टीमशी लढणार आहे. त्यामुळे आजचा सामना झाल्यानंतर संपूर्ण गणित स्पष्ट होणार आहे.

जर भारत जिंकला तर...

जर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तर त्यांचा सामना सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. कारण या विजयासह टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थानावर पोहोचणार आहे. तर दुसर्‍या गटात ऑस्ट्रेलियाची टीम दुसर्‍या स्थानावर आहे.

जर भारताचा पराभव झाला तर...

जर टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला तर सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. कारण पराभवामुळे टीम इंडिया ग्रुप अ मध्ये दुसऱ्या स्थानावर असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT