K.L Rahul Found Corona Positive Saam TV
Sports

India vs West Indies : पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का; विस्फोटक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

सलामीवीर लोकेश राहुल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : इंग्लंडविरुद्धची टी-20 आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. मात्र हा दौरा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. बीसीसीआय अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली यांनी बोर्डाच्या बैठकीत राहुलला कोरोना झाल्याबाबत माहिती दिली. (Team India K.L Rahul Found Corona Positive)

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दौऱ्याला 22 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यांमध्ये तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यात पाच सामन्यांची T20I मालिकेत खेळणे राहुलसाठी कठीण असणार आहे. काही दिवसांपूर्वी लोकेश राहुलवर जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता.

दरम्यान, आता त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्याचं आगामी दौऱ्याचं गणितही बिघडण्याची पूर्ण शक्यता आहे. मात्र कोरोनातून बाहेर येण्यासाठीही त्याच्याकडे बरेच दिवस असल्याने टीम आणि राहुल काय निर्णय घेणार? यावर त्याची पुढची वाट ही पूर्णपणे अवलंबून असणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन ट्वेन्टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत. पण वनडे आणि T20I या सामन्यांच्या वेळा मात्र वेगवेगळ्या असणार आहेत. (India vs West Indies Latest News)

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 22 जुलै रोजी खेळवण्यात येईल. ही लढत त्रिनिनादच्या क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये होईल. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. त्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. हा सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील पाहू शकता.

असा असेल भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT