india vs usa google
Sports

IND vs USA, Weather Update: भारत- अमेरिका सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी समोर आली मोठी अपडेट

India vs USA, Weather News: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर सर्वांच्याच नजरा टीकून असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट सुपर ८ चं तिकीट मिळणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

भारत आणि अमेरिका हे दोन्ही संघ तुफान फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांनी सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने आयर्लंड आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तर अमेरिकेने कॅनडा आणि पाकिस्तानला धूळ चारली आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून सुपर ८ मध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

हा सामना नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत लो स्कोरिंग सामन्याचा थरार पाहायला मिळाला आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला, तर वेगवान गोलंदाज सरस असल्याचं पाहायला मिळालं आहे. तर फलंदाज अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. या खेळपट्टीवर १२५-१३० धावा करणं फायदेशीर ठरेल.

कसं असेल हवामान?

यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना देखील याच मैदानावर झाला होता. या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. मात्र क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळाला होता. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब अशी की, या सामन्यादरम्यान पावसाचा कुठलाही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Police : पुण्याच्या १०५ पोलिसांचे मध्य प्रदेशात स्पेशल ऑपरेशन, पण खर्च केला कुणी? अधिकार्‍यांचे मौन

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Nagpur : शेतात कामाला जाताना कारने चिरडले, २ महिलांचा जागीच मृत्यू

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून या राशींचं नशीब चमकणार; शनीदेव मार्गी होऊन मिळवून देणार भरपूर पैसा

A. R. Rahman: शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते...; वडिलांच्या आठवणीत भावूक झाले एआर रहमान, सांगितला 'तो' किस्सा

SCROLL FOR NEXT