IND vs SL Asia Cup Saam Tv
क्रीडा

Ind Vs SL: श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान नाही, 'या' दिग्गज भारतीय खेळाडूचे करिअरचं संपले? संधी मिळणे अशक्य

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Team India Squad For Sri Lanka Series: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली. यामध्ये रोहित शर्माला एकदिवसीय मालिकांचे कर्णधारपद देण्यात आले आहे तर टी ट्वेंटीमध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदा देण्यात आले आहे. टी ट्वेंटी सामन्यांसाठी रोहित शर्माची निवड केलेली नाही. ज्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली असल्याची चर्चा सुरु आहे. (BCCI)

मात्र या निवडीमध्ये रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

भुवनेश्वर कुमारला संधी मिळणे कठीण:

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय कामगिरी सध्या समाधानकारक होताना दिसत नाही. त्याने शेवटचा टी ट्वेंटी सामना नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तर त्याला अलिकडच्या काळात एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी देण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

सध्या ३२ वर्षीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा हा खराब फॉर्म पाहता त्याला पुढच्या काळात संघात संधी मिळणे जवळजवळ अशक्य वाटत आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही निवड महत्वाची असताना भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता दाखवत पुढील वाटचाल अशक्य असल्याचेच संकेत दिले आहेत.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी निवडलेल्या संभाव्य टी ट्वेंटी संघात हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल , उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार या खेळाडूंचा समावेश आहे. (Indian Cricket Team)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT