Rahul Dravid Saamtv
Sports

Viral Video: लाईव्ह मॅच अन् राहुल द्रविडला Screen वर दिसले त्याचेच रेकॉर्ड; Reaction पाहाल तर थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Ind Vs Srilanka 2nd ODI: श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. कोलकात्ताच्या ईडन गार्डनवर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्यावेळी स्क्रिनवर राहुल द्रविडचेच रेकॉर्ड दाखवले गेले, जे पाहिल्यानंतर त्याने दिलेली दिलखुलास प्रतिक्रिया सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. (Viral Video)

राहुल द्रविड (Rahul Dravid) हा भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमध्ये द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने 164 कसोटी आणि 340 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले तसेच 2005-07 दरम्यान संघाचे नेतृत्व केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात द्रविड हा चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याचवेळी त्याने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा आकडा पार केला होता.

राहुल द्रविडने बुधवारी (11 जानेवारी) आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. त्याने आपला वाढदिवस कोलकात्यात भारतीय संघातील सदस्यांसोबत साजरा केला.

गुरुवारी ईडन गार्डन्सच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान राहुल द्रविडच्या कारकिर्दीची बरीच चर्चा झाली. एकदा तर राहुल द्रविडचे रेकॉर्ड टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आले, जे पाहून द्रविडला हसू आवरता आले नाही.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

Israel : इराणनंतर इस्रायलचा येमेनवर हल्ला, येमेनची 3 प्रमुख बंदरं उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT