Virat Kohli 74 International Century Saamtv
Sports

Ind vs SL ODI Series: कोहली काही थांबेना! श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; नावावर केले 2 विराट रेकॉर्ड

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तडाखेबंद खेळी करत शानदार शतक साजरे केले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील 74 वे आणि 46 वे एकदिवसीय शतक ठरले.

Gangappa Pujari

Ind vs Srilanka ODI Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय फलंदाजांनी लंकन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. सलामवीर शुभमन गिल पाठोपाठ विराट कोहलीनेही आपले शतक पुर्ण शतक केले आहे. विराटचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील 74 वे आणि 46 वे एकदिवसीय शतक ठरले.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा धावांचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली आहे. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यातही विराटने तडाखेबंद शतकी खेळी केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीलंकेविरुद्धच्या (Srilanka) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने दमदार शतकी खेळी केली. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीनेही लंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 85 चेंडूत त्याचे 46 वे एकदिवसीय शतक ठोकले. विराटच्या या शतकी खेळीत दहा चौकार आणि एक षटकारांचा समावेश आहे.

सचिनचा रेकॉर्ड मोडला...

या वादळी शतकासह विराटने (Virat Kohli) वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिनलाही मागे टाकले आहे. या यादीत विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध 10 शतके ठोकत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर सचिन तेंडूलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेल्या 9 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मायदेशात सर्वाधिक शतके:

श्रीलंकेविरुद्ध केलेल्या या शतकासोबत विराटने मायदेशात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या शतकासोबत विराटने मायदेशात 21 शतके पुर्ण केली आहेत, तर त्याच्या खालोखाल सचिन तेंडूलकर 20 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट आणि शुभमन गिलच्या दमदार शतकांच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकात 390 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता श्रीलंकेपुढे 391धावांचे मोठे लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

Indian footballer death news खेळताना अचानक मैदानावर कोसळला, २५ वर्षाच्या खेळाडूचा मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT