MsDhoni Cutout Saamtv
Sports

Ms Dhoni: माहीचा जलवा! भारत श्रीलंका मॅच पण हवा धोनीचीच; चाहत्यांनी उभारले ५० फुटाचे कटआऊट, Photo Viral

धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेवून तीन वर्ष झाली, पण तरीही त्याच्या लोकप्रियतेत तसुभरही घट झाली नाही. याचेच उदाहरण Ind Vs SL सामन्यात पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

Ind vs SL ODI Series: क्रिकेटच्या मैदानातून धोनी निवृत्त झाला असला तरी क्रिकेट प्रेमींच्या काळजात मात्र त्याच्यासाठी खास जागा आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते. मैदानाबाहेर असो किंवा मैदानात असो धोनीचे चाहते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. याचीच प्रचिती भारत आणि श्रीलंका यांच्यामधील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यांवेळी पाहायला मिळाली.

तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानावर हा सामना सुरू असताना मैदानाबाहेर धोनीच्या भल्यामोठ्या ५० फूटाच्या कटआऊटने सर्वांचेच लक्ष वेधले होते.. (MahendraSingh Dhoni)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना होणाऱ्या तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबाहेर धोनीचा तब्बल 50 फुट मोठा कटआऊट लावण्यात आला होता. धोनीच्या केरळमधील चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या माहीसाठी ग्रीनफिल्ड स्टेडियमच्या बाहेर 50 फूट मोठा कटआउट लावला. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऑल केरळा धोनी फॅन असोसिएशनतर्फे हा भलामोठा पन्नास फुटाचा कटआऊट उभारण्यात आला आहे. या कटआऊटने क्रिकेटप्रेमींचे चांगलेच लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावरही धोनीच्या या कटआऊटचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, भारत आणि श्रीलंका (Srilanka) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सर्वात मोठा वनडे विजय ठरला आहे. त्याचसोबत या विजयासह भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

SCROLL FOR NEXT