Rohit Sharma Saamtv
Sports

Ind Vs SL ODI Series: हिटमॅनने श्रीलंकन गोलंदाजांची केली जोरदार धुलाई, शतक मात्र हुकले; विराटचेही अर्धशतक

भारत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हिटमॅन रोहित शर्माची वादळी खेळी पाहायला मिळाली. वर्षातील पहिल्याच खेळीत रोहितने झंझावाती खेळी केली.

Gangappa Pujari

Ind Vs Srilanka ODI Siries: भारत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात हिटमॅन रोहित शर्माची वादळी खेळी पाहायला मिळाली. वर्षातील पहिल्याच खेळीत रोहितने झंझावाती खेळी केली. गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावा केल्या.

त्याने आपल्या खेळीत 3 षटकार आणि 9 चौकार मारले. रोहित शर्माचा स्ट्राईक रेट 123 पेक्षा जास्त होता. मात्र तरीही या खेळीचे शतकात रुपांतर होऊ शकले नाही. एका छोट्याशा चुकीने त्याला आपली विकेट गमवावी लागली. (Rohit Sharma)

रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध (Srilanka) धडाकेबाज खेळी खेळली पण त्याने अवघ्या एका धावेत आपली विकेट दिली. 24व्या षटकात दिलशान मधुशंकाच्या चेंडूवर रोहितने थर्ड मॅनवर सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच फेरीत त्याने त्याची विकेट गमावली. चेंडू त्याच्या बॅटच्या आतील कडा घेऊन विकेटवर आदळला. रोहित बाद झाल्यानंतर समालोचन करणाऱ्या गंभीरने सांगितले की, मला हा चेंडू धावण्यासाठी ढकलायचा होता पण तो चुकला.

15 महिन्यांपासून शतकाच्या प्रतिक्षेत:

रोहित शर्माने गेल्या वर्षी एकही शतक झळकावले नाही. रोहितने सप्टेंबर २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर रोहितने शतक झळकावलेले नाही. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे तर, त्याच्या बॅटमधून शेवटचे शतक 19 जानेवारी 2020 रोजी झाले होते. त्याला गुवाहाटीमध्ये शतक झळकावण्याची संधी होती, त्याला चांगली सुरुवातही मिळाली पण ती हुकली.

दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 38 षटकांत तीन विकेट गमावत २८० धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT