Circus Education: हलक्यात घेवू नका! सर्कसमध्ये काम करण्यासाठी घ्यावी लागते डीग्री; 'या' खास विद्यापीठात मिळते शिक्षण

आपण अनेकदा या सर्कस करणाऱ्यांची टिंगलही उडवताना दिसत असतो. पण, तुम्हाला माहित आहे का, सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही त्यासाठी शिक्षण घ्यावे लागते.
Circus Education
Circus Education Saamtv
Published On

Circus Education: वय आठ असो किंवा ऐंशी सर्कस पाहायला सर्वांनाच आवडते. सर्कसमध्ये होणाऱ्या गमतीजमती पाहणे हा अनेकांचा छंद असतो. सर्कसमध्ये बघायला मिळणाऱ्या चित्तथरारक कसरती आपल्याला थक्क करत असतात. त्याचबरोबर आपण अनेकदा या सर्कस करणाऱ्यांची टिंगलही उडवताना दिसत असतो. पण, तुम्हाला माहित आहे का, सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही त्यासाठी शिक्षण घ्यावे लागते. जाणून धक्का बसला ना, पण ही खरी गोष्ट आहे. (Latest Marathi News)

Circus Education
Kantara Oscar Award: 'कांतारा'ची यशस्वी घोडदौड, ऑस्करमध्ये मिळली 'ही' दोन महत्त्वाची नामांकने

कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना शिक्षण घेणे गरजेचे असते. प्रत्येक क्षेत्रासाठी खास डिग्री असते, अभ्यासक्रम असतो. पण तुम्हाला माहित आहे का, सर्कसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही त्याचा अभ्यासक्रम पुर्ण करावा लागतो. त्यासाठी त्यांना खास कोर्सही करावा लागतो. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये या गोष्टी फारशा विचारात घेतल्या जात नाहीत. मात्र ब्रिटनमध्ये खास सर्कस शिकण्यासाठी मोठ मोठी विद्यापीठे आहेत.

ब्रिटनच्या बाथ शहरात 'बाथ स्पा युनिव्हर्सिटी' (Bath University) आहे, जिथे विद्यार्थ्यांना सर्कस शिकवली जाते. बाथ स्पा युनिव्हर्सिटी समकालीन सर्कस आणि शारीरिक कामगिरी पदवी देते जी सर्कस-संबंधित प्रशिक्षण आणि वैयक्तिक स्टंटवर प्रभुत्व यावर लक्ष केंद्रित करते.

Circus Education
Accident News: एकाच बाईकवर चौघांची सवारी ठरली जीवघेणी; देवदर्शनाहून परतताना दोघांचा मृत्यू

अभ्यासक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांना एरियल अक्रोबॅटिक्स, सामान्य अक्रोबॅटिक्स आणि जगलिंग शिकवले जाते. विद्यार्थ्यांना यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात स्पेशलायझेशन करण्याचा पर्याय आहे. याशिवाय त्यांना फिजिकल थिएटर, त्यांनी कोणत्या प्रकारच्या हालचाली कराव्यात, फिटनेस आणि क्रिटिकल थिंकिंग हे शिकवले जाते.

यादरम्यान त्यांना जोकर बनणे, कार्टून, स्टँड अप कॉमेडी, थिएटर एक्टर असे गुण शिकवले जातात. या काळात विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करण्याची संधीही मिळते. कधीकधी त्यांना रस्त्यावर प्रॅक्टिकल करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर शिक्षण झाल्यानंतर त्यांना ग्रूपमध्ये सहभागी होण्याची किंवा स्वतःची कंपनी काढण्याचीही संधी दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com