मुंबई : ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात थोडा बदल होणार आहे. तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात बदल पाहायला मिळेल. उद्या म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी खेळला जाणार आहे. उद्याच्या सामन्यात दोन-तीन खेळाडू बदलले जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करणारा हार्दिक पंड्या देखील उद्याच्या सामन्यात दिसण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी संघात कोण येणार? याकडे सर्वाचं लक्ष आहे. (Cricket News)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील निर्णायक सामन्यात त्याने विजयी खेळी केली होती. मात्र हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार नाही. या मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
पहिल्या टी-20 साठी जेव्हा संघ निवडला जाईल, तेव्हा हार्दिक पंड्याच्या जागी दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. दीपक चहरने झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो संघासोबत होता. पण हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत तो संघात खेळताना दिसू शकतो.
टीम इंडियाच्या बॉलिंग साईडमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी अर्शदीप सिंगला संघात स्थान मिळू शकते. याशिवाय दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंतमध्ये कोण खेळणार हा एक प्रश्न आहे, त्याचे उत्तरही जवळपास स्पष्ट झाले आहे.
पहिल्या T20 सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल
भारत-दक्षिण आफ्रिका टी-20, वनडे मालिकेचं वेळापत्रक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिकेची सुरुवात उद्यापासून होत आहे. उद्या पहिला सामना त्रिवेंद्रम येथे खेळवला जाणार आहे. त्यांतर 1 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना गुवाहाटी येथे तर तिसरा सामना 3 ऑक्टोबर रोजी इंदूर येथे खेळवला जाईल.
एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. वनडे मालिकेचा पहिला सामना रांची येथे खेळवला जाईल. तर दुसरी वनडे 9 ऑक्टोबर रोजी लखनौ येथ तर तिसरी वनडे 11 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे खेळवली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.