नवी दिल्ली : गेल्या महिन्यात आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा समारोप झाल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सीरिजला (India vs south Africa T-20) आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या युवा खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेच्या सीरिजसाठी संधी देण्यात आलीय. आज ९ जूनला दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना होणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ आयसीसी टी-२० क्रमवारीत (ICC Ranking) अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिका चौथ्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने सलग २० टी-२० सामने जिंकून विजयपथाची सवारी कायम ठेवली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी चार मध्ये विजय संपादन केलं आहे.
केएल राहुल - कुलदीप मालिकेतून बाहेर
भारत - दक्षिण आफ्रिका सीरिज सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. कारण, भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या के एल राहुलला तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला दुखापत झाल्याने दोघेही सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे के एल राहुलच्या अनुपस्थित भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे रिषभवर आता आयपीएलचा फॉर्म देशासाठी दाखवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेसाठी टेम्बा बावुमा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
गायकवाड- इशान करणार ओपनिंग
आक्रमक सलामीवीर के एल राहुल दुखापतीमुळं सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यासाठी धडाकेबाज डावखुरा फलंदाज इशान किशन सोबत ऋतुराज गायकवाडला ओपनिंग करण्याची संधी मिळू शकते. तसंच दिनेश कार्तिकलाही प्लेईंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिकवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात उमरान मलिकचा डेब्यू होतो की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दोन्ही संघाचं संभाव्य प्लेईंग XI
भारत : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर),दिनेश कार्तिक,हार्दिक पंड्या,अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल,युजवेंद्र चहल,उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डिकॉक (विकेटकीपर),रीजा हॅंड्रिक्स, रस्सी वेन डर डुसेन, एडेन मार्करम, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड मिलर, ड्वेन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, केशव महाराज,तबरेज शम्सी, एनरिक नोर्किया.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.