team india saam tv news
Sports

Ind vs Sa 2nd Test, Day 1: टीम इंडियाची नव्या वर्षाची दमदार सुरुवात! दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या ५५ धावांवर पाडला खुर्दा

India vs South Africa 2ndTest: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय संघाने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चूकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. मोहम्मद सिराजच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ५५ धावांवर संपुष्टात आला आहे.भारतीय गोलंदाजांची दमदार सुरुवात.. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र उसळी घेणाऱ्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी पुरेपुर फायदा घेतला.मोहम्मद सिराज ,जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी अप्रतिम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक पॅव्हेलियनची वाट दाखवली.

भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पहिल्याच डावात ५५ धावांवर ऑलआऊट केलं आहे. ही भारतीय संघाविरुद्ध कुठल्याही संघाने केलेली सर्वात छोटी धावसंख्या आहे. (Latest sports updates)

याचं संपूर्ण श्रेय भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांना जातं. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने अवघ्या १५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने २५ धावा खर्च करत २ आणि मुकेश कुमारने एकही धाव खर्च न करता २ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT