team india saam tv news
क्रीडा

IND vs SA: भारत-द.आफ्रिका कसोटीपूर्वी वाईट बातमी! टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं कारण आलं समोर

India vs South Africa, 1st Test Weather Prediction: यंदा भारतीय संघ इतिहास बदलण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या कसोटी सामन्यात पाऊस हजेरी लावणार का? कसं असेल हवानान? जाणून घ्या.

Ankush Dhavre

India vs South Africa, 1st Test Weather Prediction:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंचुरियनच्या मैदानावर रंगणार आहे. गेली ३१ वर्षे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा भारतीय संघ इतिहास बदलण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या कसोटी सामन्यात पाऊस हजेरी लावणार का? कसं असेल हवानान? जाणून घ्या.

कसं असेल सेंचुरियनमधील हवामान?

या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. कारण २६ डिसेंबर म्हणजे बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी असेल.

तर हवेची गती ताशी २१ किमी इतकी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर रोजी पाऊस तर नसेल वातावरण ढगाळ असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या दिवशी पाऊस पुन्हा अडथळा निर्माण करु शकतो. कारण यादिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest sports updates)

शेवटच्या दिवशी कसं असेल हवामान?

कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस हा निर्णायक दिवस असतो. दोन्ही संघांमध्ये ४ दिवस अटीतटीची लढत रंगली तर सामन्याचा निकाल शेवटच्या दिवसापर्यंत खेचला जातो. या सामन्यातील शेवटच्या दिवशी पाऊस पडणार नाहीये.

यादिवशी जोरदार वारे असतील, मात्र पाऊस पडणार नाही. हवामान खात्याच्या अंदाजानूसार, केवळ पहिल्याच दिवशी पाऊस पडेल तर इतर दिवशी पाऊस व्हिलन बनण्याची शक्यता खूप कमी आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा, यशस्‍वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्‍मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे ४००० मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT