india vs south africa google
Sports

IND vs SA, 1st Test Live Streaming: आजपासून रंगणार 'बॉक्सिंग डे' कसोटीचा थरार! इथे पाहा फुकटात

India vs South Africa 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये लवकरच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 1st Test Live Streaming Details:

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये लवकरच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये झालेली टी -२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. त्यानंतर झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला. आता कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

आजपासून रंगणार थरार..

यावेळी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेसोबत दोन हात करताना दिसून येणार आहे. नवा कर्णधार आणि नवखे खेळाडू असलेल्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरू होईल आणि फुकटात कुठे पाहता येईल? जाणून घ्या. (India vs South Africa 1st Test Live Streaming)

या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याला (२६ डिसेंबर) आजपासून पुण्यात प्रारंभ होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. जर तुम्ही हा सामना टीव्हीवर पाहत असाल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. (Latest sports updates)

इथे पाहा फुकटात..

जर तुम्हाला हा कसोटी सामना मोबाईलवर लाईव्ह पाहायचा असेल तर तुम्ही डीज्नी प्लस हॉटस्टार ॲप डाउनलोड करू शकता. यासह तुम्ही डीज्नी प्लस हॉटस्टार या वेबसाईटवर जाऊनही या सामन्याचा लाईव्ह आनंद घेऊ शकता.

मुख्य बाब म्हणजे तुम्हाला हा सामना मोबाईल किंवा वेबसाईटवर पाहण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. सब्स्क्रीप्शन नसतानाही तुम्ही हा सामना पाहू शकता.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT