india vs pakistan t20 world cup 2024 match tickets rates are so high that you can buy your own house know the ticket rates  saam tv news
Sports

T20 WC 2024: तिकिटाच्या दरात आयुष्यभर राहाल स्वत:च्या घरात; IND-PAK सामन्याच्या तिकिटाची किंमत ऐकून व्हाल अवाक

India vs Pakistan T20 World Cup 2024: आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत किती ?

Ankush Dhavre

India vs England, T20 World Cup 2024:

आगामी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिला सामना १ जूनला रंगणार असून फायनलचा सामना २९ जून रोजी रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध रंगणार आहे. दरम्यान क्रिकेट फॅन्स भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्याच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत.

क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. या सामना येत्या ९ जून रोजी रंगणार आहे. ज्यावेळी या सामन्याच्या तिकिटांची घोषणा करण्यात आली त्यावेळी तिकिटांची किंमत केवळ ५०० रुपये इतकी होती. मात्र आता या तिकिटांची किंमत गगनाला भिडताना दिसून येत आहे. या सामन्याच्या VIP तिकिटांची किंमत ४०० डॉलर म्हणजे ३३ हजारांच्या घरात आहे. तर इतर वेब साईटवर या तिकिटांती किंमत ४० हजार डॉलर म्हणजे ३३ लाख रुपये इतकी आहे. (Cricket news in marathi)

सीटजीक नावाच्या वेबसाईटवर तिकिटांची विक्री केली जाते. या साईटवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांच्या तिकिटांची किंमत लाखात आहे. जसजशी ही स्पर्धा जवळ येत आहे तशी तिकिटांची किंमतही वाढत चालली आहे. सध्या या वेबसाईटवर तिकिटांची किंमत ही १७९.५ हजार डॉलर इतकी आहे. यासह तुम्हाला कर देखील द्यावा लागेल. म्हणजे आता तुम्हाला ही तिकिटं ५०-६० लाख रुपये इतकी आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ कुठलीही द्विपक्षीय मालिका खेळत नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामने सामने येत असतात. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT