ICC ODI World Cup 2023 IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आमने सामने येणार आहेत. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र या सामन्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते.
हा सामना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खेळवला जाणार आहे. यावेळी अहमदाबादमध्ये प्रचंड गर्दी असते. हे पाहता BCCI ला भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'आमच्याकडे जे काही मार्ग शिल्लक असतील त्याचा आम्ही विचार करू त्यानंतर निर्णय घेऊ. आम्हाला सुरक्षा एजन्सींकडून सांगण्यात आले आहे की, भारत पाकिस्तान हा हाय व्हॉल्टेज सामना आहे.त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी लाखो फॅन्स अहमदाबादमध्ये दाखल होऊ शकतात. हे टाळावं लागेल कारण, पोलिस अधिकारी त्यावेळी नवरात्रीच्या बंदोबस्तात व्यस्त असतील.' (IND vs PAK Match)
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापकत्रकाची घोषणा केली होती. या वेळापत्रकानुसार भारत - पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्युझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. (Latest sports updates)
आशिया चषक स्पर्धेत येणार आमने सामने..
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ पाकिस्तान संघाविरूद्ध २ हात करताना दिसून येणार आहे.
हा सामना २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात येत्या ३० ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.