Fans celebrate as India vs Pakistan T20 World Cup match gets confirmed after ICC intervention. saam tv
Sports

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेटमध्ये देशप्रेम की पैसाप्रेम? ICC ने दम दिल्यानंतर पाकिस्तानचा यू-टर्न

T20 World Cup Ind vs Pak: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक सामना होणार आहे. ICC ने दम भरल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वठणीवर आला आहे. लाहोरमध्ये काय घडामोडी घडल्या? पाकिस्तानच्या यू-टर्न मागे काय कारणे आहेत ? पाहूयात या रिपोर्टमधून

Girish Nikam

  • आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वठणीवर

  • भारत-पाक सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये निश्चित

  • बहिष्कार आणि धमक्यांचा हाय-व्होल्टेज ड्रामा संपला

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असलेले अनिश्चिततेचे ढग अखेर विरले आहेत. अनेक दिवसांचा हाय-व्होल्टेज ड्रामा, बहिष्कार टाकण्याची धमकी आणि आयसीसीच्या कडक भूमिकेनंतर पाकिस्तान सरकारने गुडघे टेकलेत. आता 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार कोलंबोच्या मैदानावर नियोजित वेळेनुसारच रंगणार आहे.

नेमका वाद काय होता?

बांगलादेश संघाने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला होता. या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी पाकिस्ताननेही भारतासोबतचा सामना खेळणार नसल्याचं जाहीर केलं. पण यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या आर्थिक गणितावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पाकिस्तानने लाहोरमधील बैठकीत 'हँडशेक विवाद', 'महसूल वाढ' आणि 'त्रिपक्षीय मालिका' अशा अनेक अटी आयसीसीसमोर ठेवल्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये 'हायब्रिड मॉडेल' हा सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरला आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्याने, आयसीसीला अनेकदा सामने दुबई किंवा श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवावे लागले. यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये मोठं शीतयुद्ध पाहायला मिळाले. ज्याचा परिणाम आगामी स्पर्धांच्या वेळापत्रकावरही झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

SCROLL FOR NEXT