Ind vs Pak Memes Saam tv
Sports

IND vs PAK Record: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच शेर!पाहा कसा राहिलाय IND vs PAK सामन्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड

India vs Pakistan Head To Head Record: पाहा कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड

Ankush Dhavre

India vs Pakistan Head To Head Record:

भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला ८ गडी राखून धूळ चारली.

आता भारतीय संघासमोर पुढील आव्हान पाकिस्तानचं असणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्ध दमदार रेकॉर्ड आहे. आतापर्यंत वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ एकदाही भारतीय संघाला पराभूत करू शकलेला नाही. हे दोन्ही संघ ७ वेळेस आमने सामने आले आहेत. या सातही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. त्यामुळे आज पाकिस्तानचा संघ ७-० चा स्कोअर ७-१ वर आणण्याच्या प्रयत्नात असेल. तर भारतीय संघ हा स्कोअर ८-० वर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असेल.

शुभमन गिलचं कमबॅक..

वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. संघातील आक्रमक फलंदाज शुभमन गिल डेंग्यूची लागण झाल्याने खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते.

त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. अखेर सामन्याच्या एक दिवसापूर्वी कर्णधार रोहित शर्माने शुभमन गिलच्या खेळण्याबाबत अपडेट दिली आहे. तो ९९% या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

वनडे वर्ल्डकपसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT