India vs Pakistan Final saam tv
Sports

India vs Pakistan Final: भारत- पाकिस्तानमध्ये आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार; सेमीफायनलमध्ये बांगलादेशला लोळवत गाठली फायनल

IBSA World Games 2023: आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे

Ankush Dhavre

IBSA World Games 2023 India vs Pakistan Final Match:

भारतीय अंध क्रिकेट संघाने इतिहासाला गवसणी घालत पहिल्यांदाच आईबीएसए वर्ल्ड गेम्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा धुव्वा उडवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

आता भारतीय संघाचा अंतिम सामना पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून बाजी मारली आहे.

प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाला भारतीय संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १४४ धावा करू दिल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १८ चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकला.

आईबीएसए वर्ल्ड गेम्स स्पर्धेतील अंतिम सामना आज रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. बांगलादेशविरुद्ध झालेल्या भारतीय संघाकडून दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. ३ षटकांमध्ये १७ धावांवर ३ फलंदाज माघारी परतले होते.

त्यानंतर फलंदाजी करत असलेल्या सुनील रमेश आणि नरेशभाई तुमडाने ६८ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या दिशेने नेलं. १० षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ९० इतकी होती. इथून पुढे भारतीय संघाने ७ षटके शिल्लक ठेऊन सामना जिंकला. (Latest sports updates)

यापूर्वी देखील भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने भारतावर १८ धावांनी विजय मिळवला होता. आता भारतीय संघाला पराभवाचा बदला घेण्याची आणि जेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: विक्रोळीत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT