India vs Pakistan Weather Updates saam tv
Sports

IND VS PAK, Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे पुन्हा रद्द होणार? पाहा हवामानाचे लेटेस्ट अपडेट्स

India vs Pakistan Weather Updates: वाचा सामन्यावेळी कसे असेल कोलंबोतील हवामान

Ankush Dhavre

India vs Pakistan News In Marathi:

आशिया चषकात आज सुपर ४ फेरीतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. यापूर्वी हे दोन्ही संघ पल्लेकेलेच्या मैदानावर आमने सामने आले होते.

या पावसाने अडथळा निर्माण केल्याने सामना रद्द करण्यात आला होता. पुढील सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कोलंबोतील हवामानाचे लेटेस्ट अपडेट्स.

कसं असेल हवामान?

वेदर डॉट कॉमच्या अहवालानुसार , आज कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही ८०-९० टक्के इतकी असणार आहे. सकाळी १०० टक्के पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिवस जसजसा पुढे सरकेल तसा पाऊस कमी होईल. मात्र सामन्याच्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे.

भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस..

भारत - पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. हा सामनाही पावसामुळे धुतला जाण्याची दाट शक्यता आहे. खबरदारी म्हणून आशियाई क्रीडा मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी राखीव दिवसाची घोषणा करण्यात आली आहे. जर हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

आशियाई क्रीडा मंडळाने हा निर्णय केवळ भारत - पाकिस्तान सामन्यासाठी घेतला आहे. सुपर ४ फेरीतील इतर कुठल्याही सामन्यासाठी राखीव दिवस नसणार आहे. पाकिस्तानसह सुपर ४ मध्ये असलेल्या इतर संघांच्या क्रिकेट मंडळांनी देखील या निर्णयाचे समर्थन केले आहे. हा सामना ठरलेल्या दिवशी पूर्ण होतो, की राखीव दिवसावर जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ (Team India Playing 11 Prediction):

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ईशान किशन, हार्दिक पंड्या रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/शार्दुल ठाकुर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : बीडमध्ये गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? बड्या नेत्याच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात उठली वावटळ

Anganwadi Bharti 2026: राज्यातील १ लाख अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस, जाणून घ्या सर्व माहिती

Evil Eye Remedies: दृष्ट लागली आहे हे कसं ओळखावं? कसं कराल संरक्षण?

Accident: काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचा भीषण अपघात, कार तीन-चार वेळा उलटून थेट पुलाखाली कोसळली

SCROLL FOR NEXT